Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : झोपेतच मृत्यूने गाठले; कुटुंबांवर मोठा आघात, मुसळधार पावसाने घराचे छत कोसळून दुर्घटना

Wardha News : मुसळधार पावसामुळे भीषण घटना घडली असून यात तरुणाचा मृत्यू झाल्याने परिवार तसेच ग्रामस्थांकडून प्रशासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुलगाव जवळच्या नाचणगाव येथील बडे प्लॉट परिसरातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्रीच्या सुमारास सततच्या पावसामुळे एका घराचे छत अचानक कोसळले. या घटनेत 32 वर्षीय तरुणाचा छताखाली दबून झोपेतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 

वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथील किरण बाबाराव भुजाडे (वय ३२) असे छताखाली दबून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान वर्धा जिल्ह्यात देखील पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरो लावली आहे. या पावसामुळे प्रचंड नुकसानीची झळ अनेकांना बसली आहे. यातच पुलगाव जवळच्या नाचणगाव येथे रात्रीच्या सुमारास घराचे छत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. 

तरुणाचा जागीच मृत्यू 
रात्रीच्या वेळी संपूर्ण कुटुंब झोपलेले होते. परिवार गाढ झोपेत असताना अचानक टीनाचे छप्पर, सिलिंग फॅन व छतावरील दगड कोसळले. यात किरण भुजाडे हे थेट छताखाली दबले गेले. यामध्ये किरन यांना गंभीर दुखापत झाली असून ते घटनास्थळीच मरण पावले. तर मागील खोलीमध्ये त्यांचे आई- वडील व मुले झोपलेले होते. यामुळे या दुर्घटनेत त्यांचा जीव थोडक्यात बचावला. 

मदतीची मागणी 

पत्र आणि दगड पडल्याचा आवाज झाल्याने परिवार आणि आजूबाजूचे नागरिक जागे झाले. यानंतर छताखाली दबलेल्या किरण यास बाहेर काढण्यात आले. या अपघाताने संपूर्ण नाचणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. तर पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून पीक व घरांचे मोठे नुकसान होत आहे. अशा घटनांमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK : भारतीय महिला संघाची अभिमानास्पद कामगिरी, पाकिस्तानला ८८ धावांनी लोळवलं, वर्ल्डकपमध्ये बाराव्यांदा धोबीपछाड

Maharashtra Live News Update : आदिवासी समाजाचा नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

IND W vs PAK W: अग बया! चेंडू खेळला पण क्रीझमध्ये बॅट ठेवायची विसरली अन्...; पाकिस्तानची कर्णधार पंचांना थेट भिडली

Two Group Clash : दुर्गा मूर्ती विसर्जनावरून दोन गटात राडा; वाहन आणि दुकानांची तोडफोड, पोलिस आयुक्तांसहित अनेक जखमी

SCROLL FOR NEXT