Hinganghat Crime Saam tv
महाराष्ट्र

Hinganghat Crime : रस्त्यात अडवत सोने व्यापाऱ्याला लुटले; पाच जणांना २४ तासात अटक

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथून ज्वेलरीची दुकान बंद करून जातं असलेल्या सोनाराला हिंगणघाटच्या वणा नदी परिसरात अडवून मारहाण करत त्यांच्याजवळील रोख रक्कम व दागिन्यांची लुटमार केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या २४ तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपीना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

हिंगणघाट (Wardha) येथील सुभाष नागरे यांचे वडनेर येथे ज्वेलरीचे दुकान आहे. दुकान रात्री बंद करून सुभाष हा दुकानातील सोन्या- चांदीचे दागिने, रोख व हिशोबाच्या डायऱ्या व चाब्या एका बॅगमध्ये भरून मोटारसायकलने हिंगणघाटकडे निघाले होते. दरम्यान वणा नदीच्या पुलाजवळ त्यांना अनोळखी तीन युवकांनी अडवून मारहाण करीत त्यांच्याजवळील सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. याबाबतर सुभाष नागरे यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवली. पोलिसांच्या (Police) तपासदरम्यान काही युवकांच्या हालचाली संशयित आढळून आल्या यावरून त्यांना ताब्यात घेतले असता चोरीचे बिंग फुटले.

सराफ व्यवसायीक सुभाष हा नेहमी वडनेर येथील हिंगणघाटला जातं होता. त्यांच्या हालचालीवर चोरट्यांनी नजर ठेवत कट आखला. यातील सुरेश इटणकर आणि कुणाल दुर्गे यांनी सोनार हे दुकान बंद करून निघाल्याची टीप दिली. यानंतर सोनार हा हिंगणघाट जवळील वणा नदीच्या पुलावर दुचाकीने पोचताच यातील आरोपी आनंदसिंग पंजाबसिंग टाक, दिलेरसिंग उर्फ हड्डी बावरी, रणवीरसिंग भादा यांनी रस्त्यात अडवून चाकूने वार करीत जखमी करत पैशे हिसकावले होते. घटनेनंतर चोरट्यानीं चोरीची रक्कम ही परिसरातील एका झाडा खाली पुरून ठेवले. पोलिसांनी खड्यात पुरलेले पूर्ण आभूषण जप्त केले.


पोलिसांच्या पथकांना बक्षीस 
स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावला. गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, यांच्या मार्गदर्शनता गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी, पोलीस अमलदार संतोष दरगुडे, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, यशवंत गोल्हर,भूषण निघोट, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, मनीष कांबळे, रामकिशन इप्पर, राकेश अष्टनकर आदिनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT