Sambhajinagar crime
Sambhajinagar crimeSaam tv

Sambhajinagar crime : ४ गर्लफ्रेंडचे हट्ट पुरविण्यासाठी चोरल्या २५ दुचाकी; हरसुल पोलिसांची कारवाई

Sambhajinagar news : ४ गर्लफ्रेंडचे हट्ट पुरविण्यासाठी खिशात पैसे नसल्याने पैशाची गरज भासू लागली. यातून त्याने दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली.
Published on

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : बीएस्सी कॉम्पुटरचे शिक्षण झालेल्या तरुणाने तब्बल २५ दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. या दुचाकींची चोरी हि ४ गर्लफ्रेंडचे  हट्ट पुरवण्यासाठी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. हरसूल पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

Sambhajinagar crime
Dharashiv News : आश्रम शाळा शिक्षक, कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन; भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

संभाजीनगर (Sambhajinagar) शहरात हा प्रकार समोर आला असून आदित्य राजेंद्र मोहिते असे या दुचाकी चोरी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आदित्य मोहिते यास एक नव्हे तर चार मैत्रिणी होत्या. या चारही मैत्रिणीकडून आदित्यकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी हट्ट केला जात होता. मात्र या ४ गर्लफ्रेंडचे हट्ट पुरविण्यासाठी खिशात पैसे नसल्याने पैशाची गरज भासू लागली. यातून त्याने दुचाकी चोरी करण्यास सुरवात केली. मास्टर कीचा वापर करून अवघ्या २१ वर्षाच्या या तरुणाने चक्क २५ दुचाकी चोरी (Bike Theft) केल्याचा धक्कादायक प्रकार संभाजी नगरात समोर आला.  

Sambhajinagar crime
Jalgaon Accident : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली; अपघातात तरुणाचा मृत्यू

शहरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने (Police) पोलीस या दुचाकी चोराच्या मागावर होते. दरम्यान हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसापूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती. तिचा शोध घेता घेता या आरोपीचे सगळं गौडबंगाल समोर आल. हरसूल पोलिसांनी दुचाकी पळविणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू असून त्याच्याकडून 14 दुचाकी हर्सूल पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत. तर दुचाकी चोरीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com