Wardha News Bail Pola Saam tv
महाराष्ट्र

बैल पोळ्याच्या दिवशी बळीराजावर संकट; 'सर्जा-राजा'चा होरपळून मृत्यू

बैल पोळ्याच्या दिवशी बळीराजावर संकट; 'सर्जा-राजा'चा होरपळून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे बैल पोळ्याच्या दिवशी गोठ्याला अचानक आग लागल्याने आगीत गोठ्यातील दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. सोबतच गोठ्यातील विविध साहित्याची राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्यांचे (Farmer) तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पोळा (Bail Pola) सणाच्या दिवशी संकट कोसळल आहे. (Wardha News Farmer Loss)

धनोडी (बहाद्दरपूर) (Wardha) येथील शेतकरी सतीश रामकृष्ण सोनवणे यांनी गावाशेजारील गोठा उभारला आहे. या गोठ्यात जनावरांसह जनावरांचे वैरण आणि शेती उपयोगी विविध साहित्य ठेवले जायचे. गुरूवारी पोळा सणाचे औचित्य साधून रात्रीला गोठ्यात बांधून असलेल्या बैलांचे खांद शेकल्यावर शेतकरी घरी परतला.

मध्‍यरात्रीच्‍या सुमारास अचानक आग

मात्र नंतर अचानक रात्री दीड ते दोन वाजता दरम्यान गोठ्याला आग लागली. यात गोठ्यातीलच दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदती मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

Masala Kairi Recipe: जिभेचे चोचले पुरवणारी चटपटीत मसाला कैरी घरी कशी बनवायची?

LPG Cylinder VS Induction: LPG की इंडक्शन? कशावर जेवण बनवणे जास्त स्वस्त

Maharashtra Live News Update: रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध

SCROLL FOR NEXT