Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha : मुखाग्नी देताच स्मशानभूमीत घडले भयंकर; नातेवाईकांची उडाली धावपळ

Wardha News : उघड्यावर अंत्यसंस्कार न करता अंत्यसंस्कारासाठी चांगली जागा असावी यासाठी गावाच्या बाहेर ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. मात्र जीर्ण झाल्या कारणाने ऐन अंत्यसंस्कार करतेवेळी छत कोसळल्याची घटना घडली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील साखरा येथील मोक्षधाम येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू होते. यावेळी अचानक स्मशानभूमीचे छत कोसळले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र या घटनेने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्याप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातं आहे. स्मशानभूमीचा छत एवढा जीर्ण झाले असतांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात का आले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.

गावाच्या बाहेर ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमी उभारण्यात येत असते. अर्थात अंत्यसंस्काराची सोय गावासाठी केली जात असते. त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील साखरा ग्रामपंचायत मार्फत स्मशानभूमी उभारण्यात आली होती. मात्र हि स्मशानभूमी उभारण्यास बऱ्याच वर्षांचा कालावधी झाल्याने ती जीर्ण झाली होती. अशात अंत्यसंस्कारावेळी गर्दी जमली असतानाच स्मशानभूमीची छत कोसळल्याची घटना घडली आहे. 

मुखाग्नी देताच छत कोसळले 
साखरा येथील अजब मारुती बुदे यांचे निधन झाले होते. निधनानंतर नातेवाईक घरी पोहोचू लागले. यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. नातेवाईक, आप्तस्वकीय, गावकरी अंत्ययात्रेसह मोक्षधामात पोहोचले. तेथे विधिवत अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. मृतदेह सरणावर ठेवून मुखाग्नी देण्यात आला. मृतदेहाला मुखाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अचानक स्मशानभूमीचे छत कोसळले. यामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली.

शेड दुरुस्तीची मागणी 
स्मशानभूमीच्या शेडचे छत कोसळले यावेळी सर्वजण बाहेर निघालेले होते. यामुळे सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, छत जीर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीचे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान स्मशानभूमीच्या शेडची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी साखरा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

SCROLL FOR NEXT