Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Majhi Ladki Bahin Yojana These Women Will Not Get Benefits: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेत अनेकांना ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्त वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर महिला ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑगस्टचे पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल. परंतु अनेक लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाहीये. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: चक्क ९८ वर्षांच्या आजीबाईंनी घेतला 'लाडकी'चा लाभ, वर्षभरात लाटले १८ हजार रूपये, धक्कादायक माहिती उघड

किती लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही लाभ? (These Women Will Not Take Benefit Of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेतून जवळपास ४२ लाख महिलांचे अर्ज बाद केले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. यातील २६ लाख महिला अपात्र झाल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी केली होती. दरम्यान, अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. अजूनही अनेक महिला या योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

लाडकी बहीण योजनेतून महिला अपात्र होण्याची कारणे (Reasons for Ladki Bahin Yojana Ineligible)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

  • ज्या महिला २१ ते ६५ वयोगटात बसतात त्यांनाच योजनेचा लाभ मिळतो.

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाख असायला हवे.

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात.

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने करदाते नसावेत.

जर तुम्हीही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: दरमहा मिळतात १५०० रुपये, सरकारच्या योजनेवरच लाडक्या बहिणी रुसल्या | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com