Aasha Sevika Strike Saam tv
महाराष्ट्र

Aasha Sevika Strike : आशा सेविकांचे काळ्या साड्या घालत चटणी भाकर आंदोलन; सरकार विरोधात घोषणाबाजी

Wardha News : वर्ध्यात आशा सेविका व गटप्रवर्तकांनी अभिनव पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला. काळा साड्या परिधान करून तसेच चटणी भाकर खाऊन आशा सेविकांनी निषेध नोंदवला

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: २३ दिवस संप करून देखील सरकारने मागण्या मान्य करण्याची घोषणा केली. परंतु अंमलबजावणी (Wardha) न झाल्याने पुन्हा आशा सेविका व गटप्रवर्तक संपावर ठाम आहेत. या दरम्यान काळ्या साड्या परिधान करून तसेच चटणी- भाकर खाऊन आंदोलन करत आशा सेविकांनी सरकारचा निषेध नोंदवला. (Tajya Batmya)

वर्ध्यात आशा सेविका व गटप्रवर्तकांनी अभिनव पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला. काळा साड्या परिधान करून तसेच चटणी भाकर खाऊन आशा सेविकांनी (Asha Sevika) निषेध नोंदवला आहे. जिल्ह्यातील बाराशे आशा व ५३ गटप्रवर्तक गेल्या १८ दिवसापासून राज्यव्यापी संपावर आहे. आम्ही खायचे कसे? असा प्रश्न यावेळी अशांनी उपस्थित केला. २३ दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने मागण्या मान्य करण्याची घोषणा केली होती. परंतु अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आशा व गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी संप (Asha Sevika Strike) पुकारला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तोपर्यंत संपावर ठाम 

जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही; तोपर्यंत संपावर आम्ही ठाम आहे. अशी भूमिका या आशा सेविकांनी घेतली आहे. वर्ध्यातील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ आशा सेविकांनी अभिनव पद्धतीने हा निषेध नोंदवला असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

SCROLL FOR NEXT