2 Friends Dies After Drowning River Saam Tv
महाराष्ट्र

Wardha News: वर्ध्यामध्ये नदीत बुडून जीवलग मित्रांचा मृत्यू, दोघांसोबत नेमकं काय घडलं?

2 Friends Dies After Drowning River: वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील वर्धा नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू झालाय. ही घटना पुलगावच्या वर्धा नदीवरील बॅरेजजवळ घडली. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

Priya More

चेतन व्यास, वर्धा

वर्ध्यामध्ये दोन मित्रांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुलगाव येथील वर्धा नदीच्या बॅरेजजवळ ही घटना घडली आहे. दारूच्या नशेमध्ये दोघेही नदीमध्ये उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह नदीच्या कडेला तरंगताना दिसले. या घटनेमुळे दोघांच्याही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील वर्धा नदीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू झालाय. ही घटना पुलगावच्या वर्धा नदीवरील बॅरेजजवळ घडली. सुरेश लाडेकर (वय 57 वर्षे) आणि गणेश चचाणे (वय 55 वर्षे) अशी मृतकांची नावं आहेत. दोन्ही मृतक हे पुलगावच्या घुबडटोली परिसरात राहत होते. सुरेश आणि गणेश हे दोघेही जीवलग मित्र होते. दोघेही मजुरीचे काम करायचे आणि त्यांना दारूचे व्यसन होते.

बुधवारी सुरेश आणि गणेश दोघेही कामासाठी एकत्र घराबाहेर पडले. पण संध्याकाळपर्यंत ते घरी आलेच नाही. दोघेही घरी न आल्याने दोघांचेही नातेवाईक चिंतेत आले. त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली मात्र ते भेटले नाही. गुरुवारी सकाळी वर्धा नदीच्या बॅरेजजवळ दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. मृतदेहाची तपासणी केली असता हे मृतदेह सुरेश लाडेकर आणि गणेश चचाणे यांचे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी दोघांचेहे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. त्याचसोबत त्यांच्या कुटुंबीयांना देखील याबाबत माहिती दिली. दोघेही दारूच्या नशेत पाण्यात उतरले असून पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले असल्याची माहिती आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आकास्मिक मृत्यूची नोंद केलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT