Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Maharashtra Marathi News Live Updates : आज शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, उमेदवारी अर्ज, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

कसबा मतदार संघात कॅाग्रेसमध्ये बंडाचा झेंडा

Maharashtra Marathi News Live Updates : कसबा मतदार संघात कॅाग्रेसमध्ये बंडाचा झेंडा. ⁠उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या माजी महापौर कमल व्यवहारे यांचा कॅाग्रेसचा राजीनामा

इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आज भरणार उमेदवारी अर्ज

शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही -संजय राऊत

शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही

आमच्या भाषेत वृत्तपत्राच्या एडिट झाल्यानंतर थोडासा एडिट होऊ शकतात नावात जागेत होऊ शकतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एखाद दुसरा जागेवर पुन्हा चर्चा होईल.

रामटेकची जागा शिवसेनेचे विद्यमान आमदार, सांगोलाच्या जागेवर शिवसेनेचे विद्यमान आमदार तिथे निर्णय आम्ही घेणार काय करायचे.

महायुतीमध्ये पुन्हा कोकण पॅटर्न होण्याची शक्यता;  कृष्णराज महाडिक हातात शिवधनुष्य घेणार?

भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी काल रात्री 2 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती.

खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी देण्यासाठी भेट झाल्याची माहिती.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जागा मुलगा कृष्णराज महाडिक याला मिळावी म्हणून खासदार धनंजय महाडिकांची फिल्डिंग

कृष्णराज महाडिक हातात शिवधनुष्य घेण्याची शक्यता.

कालरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती

तर आज शिवसेनेची दुसरी यादी येण्याची शक्यता.

पुणे जिल्ह्यात भरलोक वस्तीमध्ये बिबट्याचा वावर

पुणे जिल्ह्यातील वाघोली शहरांमध्ये जुन्या भाडळे वस्ती डिकॅथलॉन शेजारी भर लोक वस्तीमध्ये बिबट्याचा वावर सुरु.

चार दिवसांपूर्वीच मेंढपाळाच्या कळपावर हल्ला.

या हल्यात मेंढीचे एक पिल्लू फस्त करून मोठ्या मेंढी वरती केला गेला होता हल्ला.

या परिसरामध्ये भर लोकवस्ती असून बाजूलाच अंगणवाडी शाळा आहे या शाळेतील लहान मुले जीवितास धोका आहे.

या परिसरामध्ये रहिवाशांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी केली होती मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असून मोठी दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावणार का असा येथील रहिवाशांनी आरोप केला आहे .

वडगाव शेरी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून उमेदवारी जाहीर

कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पदाधिकाऱ्यांची नाराजी

कसब्यात काँग्रेसची डोकेदुखी वाढणार

कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पदाधिकाऱ्यांची नाराजी

पक्षाला धरून रवींद्र दंगेकर काम करत नसल्याचा ठपका ठेवत कमल व्यवहारे स्वराज्य पक्षाच्या वाटेवर

पुण्यातून कॉंग्रेस ला मोठा धक्का बसणार ,

कसबा विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे स्वराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरणार

कॉंग्रेसच्या माजी महापौर महिला प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे ‘संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्ष' च्या वाटेवर कसबा मतदार संघात स्वराज्य पक्षा कडून लढाणार ?

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे ,यांची स्वराज्य भवन पुणे कार्यालयात भेट घेतली.

कॉंग्रेसची डोकेदुखी वाढणार कसबे चे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात मोठी नाराजी

'परिवर्तन महाशक्ती' च्या आणखी २८ जागांची निश्चीती

'परिवर्तन महाशक्ती' च्या आणखी २८ जागांची निश्चीती,स्वराज्य पक्ष व प्रहार पक्ष आजच आपआपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार

पुणे : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर 'परिवर्तन महाशक्ती' ची स्थापना करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष व समविचारी नेत्यांनी एकत्र येवून राज्यातील जनतेला सक्षम पर्याय दिला आहे.

'परिवर्तन महाशक्ती' मधील महाराष्ट्र स्वराज्य पक्ष व प्रहार जनशक्ती च्या २८ जागांची निश्चिती झाली आहे तर लवकरच स्वाभिमानी पक्षाच्या देखील जागांची घोषणा करण्यात येणार आहे,

झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपमध्ये शिवाजीनगर मतदार संघातील बंडखोरी अटळ...

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सिटी रवी यांनी घेतली मधुकर मुसळे यांची भेट

मुसळे यांची नाराजी दूर करण्याचा केला प्रयत्न...

मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मधुकर मुसळे यांचा स्पष्ट नकार.

मधुकर मुसळे यांनी भरलाय शिवाजीनगर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज

भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मधुकर मुसळे यांची मनधरणी करण्यासाठी महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी सि टी रवी यांचे प्रयत्न अयशस्वी.

नागरिकांच्या सेवेसाठी त्यांच्या भावनेनुसार जिंकण्यासाठी लढणार

इंदापूरमधून आमदार दत्ता भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार

उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूर विधानसभेची उमेदवारी अर्ज दाखल करणार

आमदार अमोल मिटकरी, तसेच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार

शक्ती प्रदर्शन करत दत्ता भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार

काल सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज केला होता दाखल

बुलढाणा : प्राथमिक आरोग्य केंद्राला आग, औषध साठा जळून खाक...

खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधसाठा असलेल्या बंदद्वार कक्षाला आग लागली. त्यामध्ये उपलब्ध औषधसाठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आग विझविण्याचे कुठलेही यंत्र सामुग्री नसल्याने आगीने रुद्र रूप धरण केले होते तसेच अग्निशमन येऊच शकले नसल्याने या आरोग्य केंद्रातील औषध साठा जळून खाक झाला आहे.. ही आग स्थानी नागरिकानी विझविली... प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते. इमारतीमध्ये विद्युत फिटिंग ही फार जुनी असल्याने आग लागल्याचे समजते.. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पूर्णत दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे...

नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार  

Maharashtra News Live Updates: रत्नागिरी - गुहागर विधानसभेच्या जागेवरून महायुतीचा संभ्रम कायम

राजेश बेंडल यांच्या प्रवेशानंतरही गुहागरमधील उमेदवारीवरून पुन्हा एकदा राजकीय खलबत सुरू झाल्यामुळे उमेदवारीचा सस्पेन्स वाढला.

रवींद्र फाटक यांच्यासह विपुल कदम यांच्याकडून गुहागरच्या शिवसैनिकांकडून गुरुवारी विभागवार गुप्त बैठका

भाजपचे इच्छुक उमेदवार डॉक्टर विनय नातू यांच्याशी देखील रवींद्र फाटक आणि विपुल कदम यांची भेट

अचानक सुरू झालेल्या भेटीगाठींमुळे विपुल कदमांच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा जोरदार चर्चा

गुहागरमधील शांताई हॉटेलमध्ये झाल्या बैठका

Maharashtra News Live Updates: निशिकांत पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा आज राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करत आहेत. त्यांना इस्लामपूर येथे तुतारीचे जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवारी मिळू शकते.

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा देखील पक्ष प्रवेश होणार असून, त्यांना देखील मोर्शी येथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com