Kailash Kher Singer Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Rain : सरी आली धावून,लोकं खुर्च्या घेऊन गेली पळून! अवकाळी पावसाने उधळला कैलास खेरचा कार्यक्रम

Maha Culture Festival : तीन दिवसीय महोत्सवाच अडीच कोटींचा खर्च होता. सुरवातीच्या दोन दिवसात नागरिकांचा प्रतिसाद नव्हता आज कैलाश खेर येणार म्हणून गर्दी झाली. सुरवातीला कार्यक्रम सुरु करण्यास तांत्रिक अडचण आली आणि नंतर पावसाने हजेरी लावलीय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(चेतन व्यास, वर्धा)

Wardha Maha Culture Festival Kailash Kher Singer:

वर्धा येथे तीन दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अवकाळी पावसाचा फटका बसला. आज बॉलिवूड गायक कैलास खैर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार होता. परंतु ऐनवेळी अवकाळी पाऊस रंगात आलेल्या कार्यक्रमाचा रंग उडाला. (Latest News)

गायक कैलास खैर मंचावर येताच वरुण राजाने साद घातली आणि सर्व प्रेक्षकांची तारांबळ उडाली. पाऊस येत असल्याने प्रेक्षकांना खुर्च्या डोक्यावर घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ लागले. परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर लोकांना डोक्यावर घेतलेल्या खुर्च्यांना आपली ढाल बनवत त्यांना रेनकोट केलं आणि खुर्च्या घेऊन लोकं आपआपल्या घरी गेली. यामुळे आयोजकांचीही तारांबळ उडाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महासंस्कृतिक महोत्सव जिल्हा प्रशासनाने आयोजित केला होता पण याला देण्यात राजकीय रंग चढला होता. मात्र अवकाळी पावसाने रंगाचा बेरंग केला. या तीन दिवसीय महोत्सवाच अडीच कोटींचा खर्च करण्यात आला होता. सुरवातीच्या दोन दिवसात नागरिकांचा प्रतिसाद नव्हता. आज कैलाश खेर येणार म्हणून गर्दी झाली. सुरूवातीला कार्यक्रम सुरु करण्यास तांत्रिक अडचण आली आणि नंतर पावसाने हजेरी लावल्याने कार्यक्रम पुढे घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं

महासंस्कृतिक महोत्सवात आज कैलास खेर यांचा होता कार्यक्रम होणार होता. परंतु कार्यक्रम सुरु करण्याआधी पहिले तांत्रिक अडचण आली नंतर पावसाने कार्यक्रमात भंग केला. कैलास खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार म्हणून संध्याकाळपासून नागरिक वेळेवर उपस्थित होते. परंतु पावसामुळे नागरिकांचा हिरमोड झाला. महोत्सवाच्या उदघाट्न कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी कमी होती परंतु आजच्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

कार्यक्रमाला नागरिकाचा मोठा प्रतिसाद मिळाला परंतु ढिसाळ नियोजनामुळे हिरमोड झाला. सुरुवातीला तांत्रिक कारणामुळे कार्यक्रम लांबला. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आला. कैलास खेर मंचावर येताच नागरिकांकडून कार्यक्रम सुरू करा अशी नागरिकांनी मागणी केली, पण कैलास खेर यांनी सूर लावण्याआधीच पावसाच्या सरी पावसाच्या सरी धावून आल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, नागरिक खुर्ची डोक्यावर घेऊन कार्यक्रम सोडून गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जीएसटी पथकाची नाशिकमध्ये छापेमारी

New Marathi Serial Update : मनोरंजनाची डबल मेजवानी, २ मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

PostWork Out Meals: पोस्ट वर्कआउट मध्ये काय खावं? फिटनेससाठी हे' सुपरफूड्स उत्तम पर्याय

Pune : पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर! हिंजवडीच्या सरपंचाला झापलं | VIDEO

योग केंद्रातून बाहेर येताच छातीत कळ; पायऱ्यांवर आला हार्ट अटॅक, जागीच मृत्यू; CCTV व्हायरल

SCROLL FOR NEXT