Wardha Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha Crime News: बोगस बियाण्याच्या तपासाला गेले, अन् आढळला दारुसाठा; वर्ध्यात पोलिसांची मोठी कारवाई

Wardha Latest News: बोगस कापूस बियाणे कारखान्याचा पोलिसानांनी केला भांडाफोड

साम टिव्ही ब्युरो

Wardha Latest News: वर्धा येथील म्हसाळा परिसरात बोगस कापूस बियाणे कारखान्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजू जयस्वाल याला पोलिसांनी आज तपासाकरिता त्याच्या घरी नेले होते.

घराच्या मागील बाजूस विदेशी दारूचा पोलिसांना (Police) मोठ्या प्रमाणात साठा सापडलाय. या प्रकरणी पोलिसांनी राजू जयस्वालचे वडील सुभाष जयस्वाल वर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ लाख ४ हजार २५० रुपयाचा दारुसाठा आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोगस बियाणे कारखाना प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी एसआयटीची स्थापना केली आहे. प्रकरणातील दहा आरोपी सध्या पोलीस कोठाडीत आहे. या कारखान्याचा मुख्य सूत्रधार राजू जयस्वाल कडून पोलीस विविध माहिती घेत तपास करीत आहे.  (Latest Marathi News)

आरोपीच्या रेहकी येथील शेताची पाहणी करण्यासाठी आज सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे हे आपल्या पथक आणि आरोपी सह गेले होते. दरम्यान पोलिसांना आरोपी राजू जयस्वालच्या घरा मागील भागात मोठ्या प्रमाणात विदेशी दारुसाठा आढळला. आढळलेली दारू ही विविध कंपनीची असून मध्यप्रदेश येथे बनविल्याची माहिती आहे.

बोगस बियाणे प्रकरणात पोलिसांच्या एसआयटीच्या पथकातील विविध चमू गुजरात, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, हमदापूर येथे रवाना झाल्या असून आणखी आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. आरोपी राजू जयस्वाल हा गुजरात राज्याच्या अहमदाबाद जिल्ह्यतील राजूभाई नामक व्यक्तीकडून बियाणे आणून वर्धेत विविध कंपनीच्या पाकिटात रिपॅकिंग करत होता.

राजूभाई हा काळाबाजार गुजरात येथून संपूर्ण राज्यात करत असल्याची चर्चा आहे. आरोपी राजूभाईला अटक करण्यासाठी वर्धा पोलीस गुजरातला गेली असून लवकरच आरोपी वर्धा पोलीसांच्या ताब्यात राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT