Wardha Crime News Saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime News : वर्धा हादरले! शेतीचा वाद विकोपाला; काकू व चुलत भावाची हत्या करत संपविले जीवन

Wardha News : निमसडा येथे असलेल्या सामाईक शेतीचा वाद होता. यंदा शेती पेरण्यावरून दोघांमध्ये वाद आहे वाद विकोपाला जाऊन संतापात महिंद्राने काकू साधना आणी चुलत भाऊ नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : सामाईक शेतीच्या वादातून वर्धा जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीवरून असलेला वाद उफाळून आल्याने काकू आणी चुलत भाऊ यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्यात आली आहे. दोघांचाही मृत्यू झाल्याने सदर इसमाने स्वतः देखील विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथे घडली आहे. 

वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथे घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत काकू साधना मोहिजे (वय ५५) व चुलत भाऊ नितीन मोहिजे (वय २७) यांची हत्या करण्यात आली आहे. तर महिंद्रा मोहिजे (वय ५६) असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. दरम्यान निमसडा येथे असलेल्या सामाईक शेतीचा वाद होता. यंदा शेती पेरण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वाद घालत कुऱ्हाडीने केले वार 

दरम्यान आज साधना मोहिजे या मुलगा नितीन याच्यासह आपल्या शेतात गेले होते. यावेळी शेती पेरणीवरून पुतण्या महिंद्रा याने काकू आणी चुलत भाऊ यांच्या सोबत वाद होऊन बाचाबाची झाली. यामध्ये वाद विकोपाला जाऊन संतापात महिंद्राने काकू साधना आणी चुलत भाऊ नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये काकू साधना यांचा घटनास्थळीच तर नितीन याचा सामान्य रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. 

घटनेनंतर स्वतः केली आत्महत्या 

शेतीच्या वादातून काकू आणि चुलत भावाची हत्या केली. हि घटना घडल्यानंतर महिंद्रा याने स्वतः विष प्राशन केले. यानंतर त्याला उपचारासाठी दाखल केले असता सावंगी रुग्णालयात उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर ठाणेदार विजय घुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस अप्पर अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल चव्हाण यांनीही भेट देत माहिती घेत तपासाला सुरवात केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT