Wardha Crime Murder News Saam TV
महाराष्ट्र

Wardha Crime News: मित्रांसोबत वाढदिवसाच्या पार्टीत गेला, तिथेच झाला घात; तरुणाच्या हत्येनं खळबळ

Wardha Crime News: मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असतानाच जुन्या वादातून झालेलेल्या शाब्दिक वादाचा अंत अखेर जीवावर बेतला.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Crime News: मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असतानाच जुन्या वादातून झालेलेल्या शाब्दिक वादाचा अंत अखेर जीवावर बेतला. वर्धा ते नागपूर रस्त्यावर नालवाडी परिसरातील पेट्रोलपंपासमोर कार आडवी करीत दारुविक्रेत्याने एका तरुणावर तलवारीने सपासप वार करुन त्याची निर्घूण हत्या केली.

थरकाप उडवणारी ही घटना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. राहुल विरुळकर (वय ३२) रा. संत ज्ञानेश्वर नगर म्हसाळा, असे मृतकाचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना केली आहे. (Latest Marathi News)

दिनेश अशोक येंडाळे (रा. नालवाडी) आणि चिंटू शर्मा (रा. शास्त्री चौक), अशी फरार आरोपींची नावे आहे. इम्रान नामक तरुणाचा वाढदिवस असल्याने त्याने केळझर जवळील हायवे लगतच्या एका धाब्यावर ‘सेलिब्रेशन’ ठेवले होते.

या पार्टीत आरोपी दिनेश येंडाळे, चिंटू शर्मा आणि मृतक राहुल विरुळकर हे देखील सहभागी झाले होते. आरोपी दिनेश आणि मृतक राहुल यांच्यात जूना वाद होता. पार्टीत पुन्हा दोघांत शाब्दीक वाद झाला.

राहुल पार्टीतून निघून त्याच्या मित्रांसह कारने वर्धा (Wardha News) येथे येत होता. दरम्यान तेवढ्यातच मागाहून दिनेश येंडाळे आणि चिंटू शर्मा हे कारने भरधाव आले आणि ओव्हरटेक करुन कार थेट राहुलच्या कारसमोर आडवी लावली.

दिनेश तलवार घेत कारबाहेर निघाला आणि शिवीगाळ करु लागला. राहुल कारखाली उतरला असता दिनेश व चिंटूने राहुलला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तलवारीने सपासप वार करीत त्याची निघृर्ण हत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या राहुलला त्याच्या मित्रांनी लगेच सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉकटरांनी त्यास मृत घोषित केले.

दरम्यान, राहुलची पत्नी स्मिता हिने शहर पोलिसात (Police) तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी दिनेश येंडाळे व चिंटू शर्मा याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. मृतक राहुल आणि आरोपी दिनेश येंडाळे या दोघांत दारुविक्रीतून वाद होता. जवळपास एक महिन्यांपूर्वीपासून दोघांत वाद सुरु होता.

वडगाव येथील ग्रीन व्हिलेज बारमधून मृतक राहुल हा दारुचा माल घेत होता. ही माहिती बारमध्ये काम करणाऱ्या गुड्डू नामक नोकराने दिनेश येंडाळे याला सांगितली होती. त्यामुळे दिनेश आणि राहुल या दोघांत वाद (Crime News) सुरु होता. अखेर मित्राच्या वाढदिवशी हा वाद विकोपाला गेला आणि राहुलची हत्या करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे तीन व शहर पोलिस ठाण्याचे एक असे चार पथक आरोपींच्या शोधार्थ रवाना केले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्माच्या घरी आला 'ज्युनिअर हिटमॅन', रितिकाने दिला मुलाला जन्म

Maharashtra Rain :थंडीची प्रतीक्षा कायम! ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

SCROLL FOR NEXT