Parhani 12th Student News
Parhani 12th Student NewsSaam TV

Parbhani News: थोडा धीर धरायला हवा होता! परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने घेतला गळफास; निकाल मात्र वेगळाच लागला

Parhani 12th Student News: आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या आदल्या दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
Published on

Parhani 12th Student News: आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या आदल्या दिवशी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

सदरील घटना परभणीच्या सेलू शहरांमध्ये घडली आहे. संयुक्ता बालाजी उबाळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. संयुक्ताने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा बारावीचा निकाल आला यामध्ये ती पास असल्याचं समोर आलं.

Parhani 12th Student News
Women's Relationships: अजबच! इथे लग्न न करता गरोदर होतात महिला; शारीरिक संबंधासाठी पुरूषांना घरी बोलावतात

या घटनेमुळे उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मूळचे हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील बालाजी उबाळे हे आपल्या परिवारासह दहा वर्षांपूर्वी सेलू शहरात स्थायिक झाले होते.

त्यांची मुलगी संयुक्ता उबाळे शेलू शहरातील नूतन महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. नुकतीच पार पडलेली बारावीची परीक्षा तिने दिली होती. परीक्षेदरम्यान तिची तब्येत ठीक नसल्याने तिला रुग्णालयात देखील नातेवाईकांनी नेहमी होते.

नुकत्याच दिलेल्या बारावीच्या परीक्षेमध्ये आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील आणि आपणच नापास होऊन अशी भीती तिच्या मनामध्ये काही दिवसापासून होती. शिक्षण विभागाने बारावीचा निकाल 25 मे ला जाहीर होणार असल्याची घोषणा केली.

Parhani 12th Student News
Shocking News: माझ्या परवानगी शिवाय मला जन्म का दिला? तरुणीने आई-वडिलांवरच केली केस!

आपण बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणार या चिंतेत असलेल्या संयुक्ता उबाळे हिने 24 मे रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहते घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मुलीने आत्महत्या केली असल्याची बाब बाहेरून घरी परतल्यानंतर आईच्या लक्षात आली त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

याप्रकरणी बालाजी उबाळे यांनी सेलू पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी बारावीचा निकाल लागल्यानंतर संयुक्ता उबाळेही बारावीच्या परीक्षेमध्ये पास झाली होती.

घटनेची माहिती मिळताच शेलु पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. तर मयत मुलीचे शेलु उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या घटनेमुळे उभाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com