Wardha Crime News 17-year-old girl Physical abuse by 42-year-old man malegaon taluka incident Saam TV
महाराष्ट्र

Wardha News: आई कामानिमित्त घराबाहेर, मुलीला एकटं पाहून शेजाऱ्याची नियत फिरली; धमकावत केलं भयंकर कृत्य

Wardha Crime News: वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४२ वर्षीय नराधमाने बलात्कार केला.

Satish Daud

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

Wardha Crime News: वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४२ वर्षीय नराधमाने बलात्कार केला. ही संतापजनक घटना बुधवारी (३० ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.(Latest Marathi News)

गजानन गवई (वय ४२ वर्षे ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. वाशिमच्या मालेगाव (Washim News) पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या एका गावात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.

दुपारच्या सुमारास १७ वर्षीय घरात एकटीच होती. याच गोष्टीची संधी साधून आरोपी पीडितेच्या घरात शिरला. घराचा दरवाजा बंद करत त्याने पीडित मुलीला आतल्या खोलील खेचत नेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार (Crime News) केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

या घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. दरम्यान, पीडितेला वेदना असह्य झाल्याने तिने आई घरी येताच आपल्यासोबत घडलेला प्रकार कथन केला. मुलीवर बलात्कार झाल्याचं समजतास आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले.

पीडितेच्या आईने फिर्याद दिल्यानंतर मालेगाव पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिकचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सारिका नारखेडे करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुथडी वाहणाऱ्या मिठी नदीत तरूण वाहून गेला, एका दोरीमुळे बचावला; थरारक VIDEO समोर

Viral Video: ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का? पावसावर तरुणीचा भन्नाट रॅप, सोशल मीडियावर धुमाकूळ

Priya Bapat Photos : प्रिया बापटचा बॉसी लूक पाहिलात का? अभिनेत्रीच्या सौंदर्याने केली जादू

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली; प्रमुख ११ धरणाची शंभरीकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT