Wardha Crime News saam tv
महाराष्ट्र

Wardha Crime News: भावाने घरातच पुरला बहिणीचा मृतदेह, वडील त्यावर झोपायचे, आईही बनली निर्दयी...

Wardha Latest News: या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी मृत मुलीचे वडील, आई आणि भावाला ताब्यात घेतले आहे.

Chandrakant Jagtap

>> चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha Latest Marathi News: वर्ध्यात आजारपणाने मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह बाप-लेकाने घरातच पुरल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह पुरला, त्यावर लाकडी पाट्या टाकून वडील झोपत होते. घटनेच्या 10 दिवसांनंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे.

प्रविणा असे मृत ३७ वर्षीय महिलेचं नाव असून ती आदर्शनगर येथे राहत होती. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी मृत मुलीचे वडील, आई आणि भावाला ताब्यात घेतले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, मृत प्रविणा मागील काही महिन्यांपासून आजाराने त्रस्त होती. ती वेडसर वृत्तीची असल्याने घराबाहेर कुठेही फिरत नव्हती. अशातच ३ जुलै रोजी रात्री सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास प्रविणाचा घरीच मृत्यू झाला. आता अंत्यसंस्कार कोण करणार, पैसे कोठुन आणणार असे अनेक प्रश्न कुटुंबियांसमोर उभे झाले.

रात्रभर विचार करुन त्यांनी दुसऱ्या दिवशी ४ जुलै रोजी सकाळी ७ वाजता मुलीचा मृतदेह घरातच खड्डा खणून पुरला. याबाबतची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांना १३ रोजी दुपारी १२ वाजता मिळाली. पोलिसांनी तत्काळ आदर्शनगर गाठून घराची पाहणी केली असता घरात खड्डा खणल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तत्काळ याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांना दिली. रात्री ७ वाजता फॉरेन्सिक चमूसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह खड्ड्याबाहेर काढला.

वडील साहेबराव आणि भाऊ प्रशांत यांना पोलिसांनी प्रविणाबाबत विचारपूस केली असता प्रविणाला घरातच पुरल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी प्रविणाचे घर गाठून पाहणी केली तेव्हा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी मातीवर लाकडी पाटा आणि त्यावर दगडं, विटा ठेवल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. (Tajya Marathi Batmya)

भस्मे कुटुंबातील सर्वच सदस्य वेडसर प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मुलगी प्रविणाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता, त्यावर लाकडी पाट्या टाकून वडील साहेबराव झोपायचा. त्याच्या बाजूलाच भाऊ पलंगावर झोपायचा. हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Breaking News)

प्रविणाचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तब्बल पाऊणतास खोदकाम झाल्यावर प्रविणाचा मृतदेह खड्ड्याबाहेर काढण्यात आला. रात्रीची वेळ असल्याने लाईटच्या उजेडात मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूंकडून घटनास्थळीच करण्यात आले. मृतदेहावर अंत्यविधी पार पाडण्यासाठी नजीकच्या स्मशानभूमीत व्यवस्थाही करण्यात आली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून महागड्या दुचाकीच्या स्पीडो मीटरची चोरी

Politics : बडा खेला हो गया! मतदानाच्या आदल्या दिवशीच मोठा गेम; 'जन सुराज'च्या नेत्याचा उमेदवारी सोडून भाजपमध्ये प्रवेश

Mangal Shukra Yuti 2025: 18 महिन्यांनी बनणार मंगळ-शुक्राचा संयोग; 'या' ३ राशींच्या नशीबी पैसाच पैसा

Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT