>>भूषण शिंदे, साम टीव्ही
CM Eknath Shinde attack on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी या योजनेसह, राज्य सरकारच्या योजनांबाबत होऊन जाऊ दे चर्चा म्हणत विदर्भ दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला होता. त्याला आज ठाण्यातील मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शासन आपल्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचा शुभारंभ आज ठाण्यातून झाला आहे. याठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याला संबोधित केले.
ते म्हणाले, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ठाणे हे आपल्या दिघे साहेबांचे राहणार. या ठाण्याने इतिहास घडवला आहे. काही लोकांना वाटतं आता कसं होणार? काय होणार? पण ठाणे हे शिवसेनेचेच राहणार आहे.
शिंदे म्हणाले, आनंद दिघे यांच्या आशीर्वाद मुळेच आपण लढलो आणि जिंकलो देखील. सर्वासामान्य लोकांना प्रेरित करण्याची ताकद बाळासाहेब यांच्या शब्दात होती आणि दिघे साहेब तर न बोलताच प्रेरित करायचे. आज आपल्या सरकारला वर्ष झाले. आधी मी आणि देवेंद्र आम्ही दोघेच होतो आता अजित पवार आपल्यासोबत आहेत. आपण जे निर्णय घेतले त्यामुळे सर्वासामान्य लोकांच्या आयुष्यात बदल घडत आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्या अभिनंदनचा ठराव आपण तेव्हा घेऊ शकलो नाही आणि 370 कलम हटवली तेव्हा देखील आपल्याला जल्लोष करता आला नाही. त्यानंतर आपण निर्णय घेतला. सत्तेतून बाहेर पडणारे आपण जगातील एकमेव आहोत.
पुढे काय वाढून ठेवलंय हे माहित नव्हतं. लढू नाहीतर शाहिद होऊ. या राज्याच्या जनतेची हितासाठी आम्ही निर्णय घेतला, स्वार्थासाठी नाही. आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो. त्यावेळी वस्तुस्थिती अशीच होती. आपल्या सैनिकांवर गुन्हे दाखल होत होते. आपल्या सैनिकाच्या केसाला धक्का लागणार नाही ही काळजी आपण घ्यायला हवी.
सत्ता येते जाते. पण सत्ता नसताना सुद्धा लोक तुमच्यासाठी थांबले पाहिजेत. स्वतःसाठी सगळेच जगतात. दुसऱ्याचे दुःख हलके करण्याचे काम जो करतो तो खरा माणूस. माणूस कर्माने मोठा होतो. रस्त्याने जाताना लोकांनी थांबून विचारलं पाहिजे. पण सत्तेसाठी बाळासाहेब यांच्या विचारांना पायदळी तुडवले. बाळासाहेब यांनी ज्यांना दूर ठेवले त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत गेलात. बाळासाहेब आणि मोदीजी यांचे फोटो लावून मते मागितली. आमच्याकडे सगळं आहे. पण काढायला लागलो तर पाळता भुई थोडी होईल. जनता सुज्ञ आहे. आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र यांना तुम्ही कलंक म्हणता? मला देवेंद्र यांनी सांगितले कि एकनाथ तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. याला मनाचा मोठेपणा लागतो. देवेंद्र फडणवीस यांना महापालिका घेता आली असती, पण त्यांनी ती घेतली नाही. याची परतफेड तुम्ही कशी केली...?? असा सवाल देखील यावेळी त्यांनी विचारला. (Tajya Marathi Batmya)
पुढे बोलताना ते म्हणाले की, शासन आपल्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसे कळेल? आम्ही नोटा मोजण्याचा मशीन नाही घेत, पण आम्हाला शिलाई मशीन देण्याचा आंनद मोठा आहे. बाळासाहेब यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. (Latest Political News)
ते म्हणाले, अजित दादा हे या विकासाला साथ देण्यासाठी सोबत आले. तुम्हाला वाटत असेल काय होणार? कसे होणार? काही गणित असतात. आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमची युती ही भावनिक आहे. ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. काही काळजी करू नका, असे अश्वासन देखील शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.