Wardha News, Court saam tv
महाराष्ट्र

Wardha News : कुमारिकेवर मातृत्व लादणाऱ्या युवकाला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

या प्रकरणात शासनातर्फे न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मारण्याची धमकी देत मातृत्व लादणा-या नराधम अमित उर्फ बापू विनोद दरवरेकर (२७, रा. पिपरी मेघे) याला बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी ही शिक्षा ठाेठावली आहे. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना पीडितेला मनोधैर्य योजनेंतर्गत पुनर्वसनासाठी नुकसान भरपाई देण्याचे आदेश केले आहेत. (Maharashtra News)

पीडिता ही १५ वर्षांची होती. संशियत अमित पीडितेच्या भावाचा मित्र असल्याने तो त्यास भेटण्यासाठी पीडितेच्या घरी येत होता. २० ऑक्टोबर २०१५ रोजी अमितने पीडितेला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून निर्जनस्थळी नेत पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पीडितेने नकार दिला, मात्र, अमित याने तिला तुझी बदनामी करेन अशी धमकी देत पीडितेसोबत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

मार्च २०१६ नंतर पीडितेला चक्कर येणे, मळमळ होणे आदी लक्षणे दिसू लागल्याने तिने अमितला ही बाब सांगितली. मात्र, त्याने तिच्याशी बोलणे बंद केले. दोन आठवड्यांनी तिचे पोट दिसू लागल्याने तिच्या आईने विचारणा केली असता घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला.

पीडितेने याबाबतची तक्रार नोंदविली. पीडितेला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असता तिने मुलाला जन्म दिला. पीडितेला झालेले बाळ हे संस्थेला देण्यात आले. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

या प्रकरणात शासनातर्फे न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, सहा. रासायनिक विश्लेषक यांनी पीडितेला झालेल्या मुलीचे वडील आरोपी असल्याबाबत अहवाल दिला तसेच इतर साक्षीदार यांची साक्ष तसेच सरकारी पक्षांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: १० तोळा सोन्याचे दर ६००० रुपयांनी वाढले; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर

Real Money Gaming: ऑनलाइन गेमिंगवर मोठा बदल! सरकार Real Money Gamesवर बंदी आणण्याच्या तयारीत, नेमका प्रकार काय? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा

राज ठाकरे-फडणवीसांची अचानक भेट, उद्धव ठाकरेंच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया, दोन शब्दात विषय संपवला

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर होणार टीम इंडियाचा कर्णधार? BCCI चा नवीन प्लॅन, वर्ल्ड कपआधी होणार घोषणा

SCROLL FOR NEXT