Wardha Government Hospital  Saam Tv
महाराष्ट्र

Wardha : महिला शौचालयाच्या कचरा पेटीत आढळले मृत अर्भक; वर्ध्यात धक्कादायक घटना उघड

Wardha Government Hospital News : वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला प्रसाधनगृहाच्या डस्टबिनमध्ये मृत नवजात अर्भक आढळून आले. पोलीस व रुग्णालय प्रशासन तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला प्रसाधनगृहात मृत अर्भक सापडले

  • परिसरात रक्ताचा थारोळा, डस्टबिनमध्ये नवजात मृतदेह आढळल

  • लिंग व मृत्यूचे कारण DNA अहवालानंतर स्पष्ट होणार

  • पोलीस व रुग्णालय प्रशासनाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

चेतन व्यास, वर्धा

एकीकडे मुलबाळ नाही म्हणून कित्येक आई-वडील देवाचा धावा करतात. तर दुसरीकडे मुलाला जन्माला घालून त्याची हत्या करण्यात येते. किंवा बेवारस वाऱ्यावर सोडलं जात. या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहेत. अशाच प्रकारची मन सुन्न करणारी घटना वर्ध्यातून समोर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळी महिला प्रसाधनगृहात मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ माजलीय. हा अर्भक पुरुष जातीचा आहे की महिला जातीचा हे अद्याप कळू शकले नसून त्याला डीएनए साठी पाठविण्यात आले आहे. अहवालनंतर नेमके कारण समजू शकणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास स्त्री रोग विभागाच्या बाजूला असलेल्या महिला प्रसाधन गृहात सफाई कर्मचारी गेले असता, तेथे मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले पाहायला मिळाले. पाहणी केली असता तेथीलच निळ्या रंगाच्या डस्ट बिनमध्ये एक मृत अवस्थेत अर्भक आढळून आले.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयातील नागरिकांनी तेथे गर्दी केली.अर्भक नेमका कोणाचा या चर्चेला सुरुवात झाली. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलांची माहिती घेतल्यावर त्यापैकी कोणाचाही हा अर्भक नसल्याचं प्राथमिक अंदाज लावण्यात आला. घटनास्थळी पोलिसांसह अधिकाऱ्यांनी भेट देत प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

जिल्हाधिकारी सामान्य रुग्णालयात सगळीकडे सिसिटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. मात्र या परिसरात कॅमेरे नसल्याने नेमका अर्भक कोणाचा याचा खुलासा झाला नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जातं असून रुग्णालयातील कॅमेरे तपासले जातं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगेश काळोखेंना भररस्त्यात संपवलं; खोपोलीत हत्येचा सीसीटीव्ही आला समोर

Maharashtra Live News Update: चांदवड येथील राहुड घाटात कंटेनर उलटले, ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात

Ratnagiri: गुहागरमधील समुद्रात पोहताना एकाच कुटुंबातील तीनजण बुडाले, एकाचा मृत्यू

मंगेश काळोखेंच्या हत्येचा कट कुठे शिजला? शिंदे गटाच्या आमदाराचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Genelia Deshmukh: 'तेरे बिना जिया जाए ना...'; देशमुखांच्या सूनेचा व्हिंटेज लूकमधील नवीन फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT