Shaktipeeth Expressway Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Wardha News: 'योग्य मोबदला द्या अन् आमच्या जमिनी घ्या', शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी वर्ध्यातील शेतकरी रस्त्यावर

Gangappa Pujari

चेतन व्यास, वर्धा|ता. १ जुलै २०२४

एकीकडे शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी राजकीय नेते आक्रमक झाले असताना दुसरीकडे या महामार्गाच्या समर्थनार्थ वर्धेचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करू नका, आम्हाला योग्य मोबदला द्या आणि आमची जमीन अधिग्रहण करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शक्तिपीठ महामार्गाला वर्धा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी समर्थन दिले आहे. या महामार्गाच्या समर्थनार्थ यवतमाळ सह अन्य जिल्ह्याचे शेतकरीसुद्धा रस्त्यावर उतरले आहेत. फक्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा अन् त्यांची जमीन अधिग्रहित करावी. अशी मागणी करत वर्धा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या महामार्गमुळे अनेक फायदे होणार असून दळणवळण सोपी होणार आहे. यापूर्वी समृद्धी महामार्गालासुद्धा विरोध करण्यात आला होता आता शक्तिपीठला विरोध केला जात आहे. केवळ अधिग्रहनाची किंमत वाढविण्यासाठी आंदोलन केले जाते आहे असा आरोप यावेळी वर्धेच्या शेतकऱ्यांनी केला.

दरम्यान, शासनाकडून जमिनीचा मोबदला हा चार पट दिला जातो पण या महामार्गाच्या वेळी सरकारने योग्य दराने व निकष लाऊन अधिग्रहण करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT