Wardha Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Wardha News: अत्यंत दुःखद; बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

Bail Pola News: अत्यंत दुःखद; बैल पोळ्याच्या दिवशीच शेतकरी पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

Satish Kengar

Wardha Latest News:

वर्धा जिल्ह्यात एका अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे बैल पोळ्याचा सण असल्याने गावात सण साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू होती. अशातच बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हिवरा परिसरात ही घटना घडल्याचं समजतं आहे. या घटनेने गुंजखेडा गावावर शोककळा पसरली आहे. राजू पुंडलिक राऊत (५३), चंद्रकांत राजू राऊत अशी मयत व्यक्तींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी राजू राऊत यांचे शेत हिवरा शिवारात आहे. यामुळे राजू व त्यांचा मुलगा चंद्रकांत हे दोघेही जवळील तलावातील पाण्यात बैलांना धुण्यासाठी घेऊन गेले होते. (Latest Marathi News)

यावेळी बैल धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात गटांगळ्या घेत बुडाले. यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावात शोकमग्न वातावरण होते. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी मुलगा चंद्रकांत याचा मृतदेह तलावाबाहेर काढला असून वडील राजू यांचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पुलगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून पंचनामा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपूरमध्ये आई वडिलांचा क्रूरतेचा कळस, १२ वर्षाच्या लेकाला साखळीने बांधलं, घरातच डांबून ठेवलं; नेमकं काय प्रकरण?

Sleep Tips : झोपा झटपट पटापट! वेळेवर झोपण्याचे ४ असे फायदे की आजार आसपासही फिरकणार नाहीत

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

PM Kisan Yojana: आजच हे काम करा, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००; वाचा नवी अपडेट

Venus And Sun Yuti: जानेवारीमध्ये बनणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT