Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: वाल्मीक कराडला गंभीर आजार, कोठडीत पाहिजे २४ तास असिस्टंट; ठोठावलं कोर्टाचं दार

Walmik Karad Custody Assistance: वाल्मीक कराडने गंभीर आजार झाला असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी त्याने कोठडीमध्ये २४ तास मदतनीस पाहिजे अशी मागणी करत थेट कोर्टात धाव घेतली आहे.

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि २ कोटीच्या खंडणी प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड सीआयडीच्या कोठडीमध्ये असून त्याची चौकशी सुरू आहे. वाल्मीक कराडने केज न्यायालयामध्ये धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे वाल्मीक कराडने न्यायालयाला २४ तास मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे.

वाल्मीक कराडने केज न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, 'मला स्लीप अ‍ॅप्निया नावाचा आजार झाला आहे. यामध्ये झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. ऑटो सीपॅप ( Auto CPAP) मशीनची या आजारात आवश्यकता असते. ही मशीन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करते. हे मशीन लावण्यासाठी मला मदतनीस पाहिजे आहे.'

ऑटो सीपॅप मशीन चालवण्याबाबत त्यांच्यासोबत नेहमी राहत असलेल्या रोहीत कांबळे या सहाय्यकाला माहिती आहे. त्याला सोबत ठेवण्याबाबतची विनंती वाल्मीक कराडने अर्जाद्वारे केली असल्याची माहिती समोर आली होती. वाल्मीक कराडने केलेल्या मागणीची केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मीक कराड मंडळवारी दुपारी पुण्यातील सीआयडी मुख्यालयात शरण आला. त्यानंतर सीआयडीने वाल्मीक करायला अटक केली. त्यानंतर वाल्मीक कराडची रवानगी १५ दिवसांच्या सीआयडी कोठडीमध्ये करण्यात आली. दरम्यान, २ कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेची चौकशीत मोठी कबुली दिली आहे. वाल्मीक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली विष्णू चाटेने सीआयडीला दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

करिना- ऐश्वर्याशी तुलना, बेदीच्या मुलीने मार्केट खाल्लं, फोटो झाले तुफान व्हायरल

Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

Pune Shaniwar Wada : पुण्यातील शनिवारवाड्यात नमाज पठण? Video

आंघोळ कधी वापरतात माहितीये का? तुम्हीही चुकीचा शब्द वापरताय

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

SCROLL FOR NEXT