Dhananjay Munde And Walmik Karad Saam Tv
महाराष्ट्र

Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडेंनी दिली वाल्मिक कराडची सुपारी?

Dhananjay Munde And Walmik Karad: सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातला मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत निलंबित पीएसआय रणजित कासलेंनी नवा दावा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली.

Priya More

भरत मोहोळकर, साम टीव्ही

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी धनंजय मुंडेंनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा दावा कुणी केलाय? आणि या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रीया दिलीय? हे आपण या स्पेशन रिपोर्टमधून पाहणार आहोत...

ऐकलंत.... सरपंच हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत निलंबित पीएसआय रणजित कासलेंनी नवा दावा केला आहे. यात रणजित कासलेंनी थेट धनंजय मुंडेंनीच कराडच्या एन्काऊंटरचा प्लॅन आखल्याचा आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर कासलेंच्या आरोपांसंदर्भात धनंजय मुंडेंच्या सहभाग शोधण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बिहारला लाजवेल, अशा घटना बीडमध्ये घडत आहेत. त्यातच वाल्मिक कराडचे काळे कारनामे समोर आल्यानंतर आता वाल्मिक कराडचाच काटा काढण्याविषयीचे दावे समोर येत आहेत. त्यावरुन संजय राऊतांनीही मुंडेंचं नाव न घेता त्यांची चौकशी करण्याची मागणी केलीय.

सरपंच हत्या प्रकरणाचं विदारक चित्र दाखवणारे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही मुंडेंवर सातत्याने आरोप होत आहेत. तर या आरोपानंतरही मुंडेंनी मौन बाळगलंय. त्यामुळे रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी करुन मुंडेंभोवतीचा फास आवळला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT