walk held to protest delay in govind pansare case probe kolhapur news sml80 saam tv
महाराष्ट्र

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी मोकाट... पाेलिसांसह सरकार अपयशी, निर्भय मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून काेल्हापूरवासियांनी नाेंदविला निषेध

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनातील मुख्य मारेकरीला लवकर पकडा अशी मागणी पानसरे कुटुंबीय आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कॉम्रेड गोविंद पानसरे (govind pansare) यांच्या खुन्याला पकडावे तसेच पानसरे यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पाेहचविण्यासाठी आज (मंगळवार) काेल्हापूरात नागरिकांनी निर्भय मॉर्निंग वॉक (nirbhay morning walk) उपक्रम राबविला. या उपक्रमात शेकडाे नागरिक सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाला आज 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 9 वर्षांमध्ये पानसरेंच्या खुनातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार यांना अजूनही अटक करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. हे फक्त पोलिसांचे अपयश नसून राज्य सरकारचे देखील अपयश आहे.

त्यामुळेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या घरापासून आज निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मारले तरी देखील त्यांचा विचार मारता येणार नाही हा संदेश देत निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मॉर्निंग मध्ये अनेक चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात आले आहेत. दरम्यान सध्या जरी ही बाब न्यायालयीन असली तरी लवकरात लवकर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनातील मुख्य मारेकरी पकडावे अशी मागणी पानसरे कुटुंबीय आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT