vitthal sahkari sugar factory, pandhapur news saam tv
महाराष्ट्र

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यानं १२ कोटींच्या वसुलीसाठी माजी अध्यक्ष, संचालकांना धाडल्या नाेटीसा

सध्या कारखान्यावर सुमारे सहाशे कोटींचे कर्ज आहे.

भारत नागणे

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (vitthal sahakari sakhar karkhana) थकीत सुमारे १२ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष व संचालकांसह सुमारे चारशे जणांना कारखान्याने नुकत्याच नोटिसा (notice) पाठवल्या आहेत. यामुळे पंढरपूरच्या (pandharpur) राजकारणात (politics) मोठी खळबळ उडाली आहे. (pandharpur latest marathi news)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये सत्ताधारी भगीरथ भालके - कल्याणराव काळे गटाचा पराभव झाला. डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल विजयी झाले आहे. येत्या २१ जुलै रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. त्यापूर्वीच अभिजीत पाटील यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे.

थकबाकी वसुलीचा एक भाग म्हणून कारखान्याने थकबाकी वसूलीची मोहिम हाती घेतली आहे. मागील अनेक वर्षांपासून थकबाकीदार असलेल्या माजी अध्यक्षांसह संचालकांना थकबाकी भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. थकबाकी न भरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी ही कारखान्याने सुरू केल्याची माहिती नूतन संचालक अभिजीत पाटील यांनी दिली.

सध्या कारखान्यानं माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सुळे यांच्यासह माजी संचालकांना नाेटीसा पाठविल्या आहेत. कारखान्यांशी संलग्न असलेल्या विठ्ठल सर्व सेवा संघातून मोठ्या प्रमाणावर रक्कम उचलून नेल्या आहेत. या रक्कमा संबंधित लोकांकडे मागील अनेक वर्षांपासून थकल्या आहेत. सध्या कारखान्यावर सुमारे सहाशे कोटींचे कर्ज आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मित्र झाला वैरी! डोक्यात दगड घालून मित्राला संपवलं; २४ तासात दोन खुनाच्या घटनांनी सांगली हादरलं

Akshaya Tritya: तीन राशींसाठी अक्षय तृतीया असेल खास; करिअरमधील प्रगतीसह संपत्तीत होईल वाढ

Custard Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट कस्टर्ड, वाचा सोपी रेसिपी

सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीत निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य - शरद पवार

SCROLL FOR NEXT