विजय पाटील, सांगली प्रतिनिधी
Fire breaks out in Sangli residential building, four dead, two injured : सांगलीमध्ये अग्नितांडवात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज सकाळी तीन मजली इमारतीला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान आणि स्थानिकांनी मदतकार्य तात्काळ सुरू केले. पण आगीमध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. दोन जण जखमी आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने विटा शहरावर शोककळा पसरली आहे.
सांगलीमधील विटा येथे आज सकाळी तीन मजल इमारतीला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले आहेत. आई-वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवला जातोय.
विष्णु जोशी (वय 47) सुनंदा विष्णु जोशी (वय 42), प्रियांका योगेश इंगळे (वय 25 ) आणि सुष्टी इंगळे (वय 2) अशी मृतांची नावे आहेत. विटा शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्टील फर्निचर दुकानाला आज सकाळी आग लागली. ही आग झपाट्याने पसरली अन् तीन मजली इमारत आगीमध्ये जळून खाक झाली.
यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि अग्निशामन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंतस चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या आगीत दोन जणांना वाचवण्यात यश आले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.