Roof Collapse Tragedy : ऐन निवडणुकीत मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, घराचे छत कोसळले अन् होत्याचे नव्हते झाले

five of a family die in Patna roof collapse : बिहारच्या पटन्यात दानापूर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेनंतर राज्यात शोककळा पसरली आहे.
five of a family die in Patna roof collapse
five of a family die in Patna roof collapse danapurSaam TV marathi
Published On

Patna danapur roof collapse kills five family members : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडणार आहे, तर शुक्रवारी राज्यात नवे सरकार कुणाचे येणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या रणधुमाळीतच राजधानी पटनामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पटनामध्ये घराचे छत कोसळून एकाच घरातील पाच जणांचा दुर्दैवी शेवट झाला आहे. पटनामधील दानापूरमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

दानापूरमध्ये रविवारी खान कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. एका क्षणात अख्खं कुटुंब नाहीसे झाले. रविवारी रात्री सर्वजण झोपले होते, त्याचवेळी काळाने घाला घातला. घराचे छत कोसळले अन् पाच जणांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर गावावर शोककळा पसरली. मृतांमध्ये बबलू खान (32) याच्यासह सगळ्या कुटुंब क्षणात नाहीसे झाले. रौशन खातून (30), मोहम्मद चांद (10), रूकशार (12) आणि चांदनी (2) यांचा मृत्यू झाला. घराचे छत कोसळलं त्यावेळी सर्वजण गाढ झोपेत होते.

five of a family die in Patna roof collapse
Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

घराचे छत अचानक कोसळले

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार खान कुटुंब झोपेत होते, त्यावेळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घराचे छत कोसळले. आवाज ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली अन् मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच अकिलपूर पोलिसांनीही घटनास्थळावर धाव घेतली. तात्काळ मलबा काढण्याचे काम करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर जाला होता. पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृतदेह तात्काळ पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत.

५ जणांच्या मृत्यूची बातमी समजताच अन् गावात शोककळा पसरली. मृतांच्या कुटुंबियांचा आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर आले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृताचा नोंद केली आहे.

five of a family die in Patna roof collapse
Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

घर कमकुवत झाले होते.

अकिलपूर पोलिस स्टेशनचे प्रमुख विनोद कुमार यांनी घटनास्थळावर धाव घेतली होती. ते म्हणाले की, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. प्राथमिक तपासानुसार घराचे छत खूप जुने होते. सतत पाऊस आणि ओलाव्यामुळे घराचे छत कमकुवत झाले होते. त्यामुळेते अचानक कोसळले असू शकते. प्रशासनाने पीडितांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

five of a family die in Patna roof collapse
Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com