Nalasopara Accident Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara Accident : कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून कारची तोडफोफ

Virar News : नवशी बसवत व तिच्या सोबत आणखीन एक महिला राजोडी भीमनगर येथील रस्त्यावरून पायी सत्पाळा येथील घरी जात होते.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे 

विरार : नालासोपाऱ्याच्या सत्पाळा राजोडी रस्त्यावर एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका (Virar) वेठबिगारी करणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. नवशी बसवत (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. (Live Marathi News)

सदर अपघातात (Accident) मृत महिला सत्पाळा नाका ग्रामपंचायत कार्यालया मागे राहत होती. दरम्यान शनिवारी संध्याकाळी राजोडी रान येथून महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली होती. नवशी बसवत व तिच्या सोबत आणखीन एक महिला राजोडी भीमनगर येथील रस्त्यावरून पायी सत्पाळा येथील घरी जात होते. याच दरम्यान तिला कारने जोरदार धडक दिली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच (Death) मृत्यू झाला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारची तोडफोड 

या घटनेनंतर पळून जाणाऱ्या कारमधील दोन जणांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडून बेदम मारहाण केली. तसेच संतप्त जमावाने गाडीचीही तोडफोड केली. अर्नाळा सागरी (Police) पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर अर्नाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी चालक कुलदीप मिश्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT