Virar Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Virar Crime News : प्रियकराला झाडाला बांधून १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; विरारमधील संतापजनक घटना

Virar Crime News : प्रेयसीसोबत बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोन जणांनी अडवलं. त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. आरोपी इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार देखील केला.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Virar Crime News : प्रेयसीसोबत बाहेर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोन जणांनी अडवलं. त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. आरोपी इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार देखील केला. ही संतापजनक घटना मुंबईतील विरार शहरात बुधवारी (२२ मार्च) घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींनी विरार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर  पोलिसांनी (Police) न्यायालयात हजर केले. यानंतर त्यांना २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी मुंबई उपनगरातील विरार येथील साईनाथ नगर भागातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही शहराजवळील (Virar News) टेकडीवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास फिरायला गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी दोन जण आले आणि त्यांनी प्रियकरासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. यादरम्यान, प्रेयसी मध्यस्थी करत असताना दोघांचीही नियत फिरली.

त्यांनी तरुणीच्या प्रियकराला झाडाला बांधलं त्यानंतर तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. दरम्यान, प्रियकराने कशीबशी सुटका केली. या दोघांना विरोध करताना त्याने बाजूला पडलेली काचेची बाटली एकाच्या डोक्यावर मारली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले.  (Latest Marathi News)

या भयानक घटनेनंतर (Crime News)  तरुणी आणि तिच्या प्रियकराने पोलिसांत धाव घेतली. तक्रार दाखल होताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीला तातडीने उपचारासाठी दाखल करून, त्यांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन एक जखमी आरोपी उपचारांसाठी दवाखान्यात येईल, अशा सूचना दिल्या होत्या.

दरम्यानच्या काळात फरार आरोपींपैकी एक जण जखमी असल्याने एका डॉक्टरकडे उपचारासाठी गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा विरार पोलिसांनी तात्काळ दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. याप्रकरणी आरोपींवर जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार अशा स्वरूपाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Mumbai : धक्कादायक! केईम हॉस्पिटलमध्ये रूग्णाने केली आत्महत्या, हादरवणारे कारण आले समोर

विधानपरिषदेत शिंदेसेनेला 2 जागा; विदर्भातून या नावाची चर्चा, कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT