Mumbai Local Train : धावत्या लोकल ट्रेनमध्ये सर्वांसमोर प्रेमीयुगुलाची रासलीला; रोमान्स करतानाचा VIDEO व्हायरल

Local Train Couple Romance Video : प्रेमीयुगुलाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला
Mumbai Local Train Couple Romance Video
Mumbai Local Train Couple Romance VideoSaam TV

Mumbai Local Train Couple Romance Video : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अनुभव येत असतात. माणूसकी, राग, भांडणं, मैत्री, प्रेम याचा अनुभव मुंबईतील चाकरमान्यांना आता सवयीचा भाग बनलाय. मात्र, अनेकदा याच लोकल प्रवासात रोमान्स आणि लव्ह बर्डचे नखरेही पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्रेमी युगुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  (Breaking Marathi News)

Mumbai Local Train Couple Romance Video
Jalna Crime : शेतजमिनीचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने चक्क लहान भावालाच संपवलं; संतापजनक घटना!

व्हिडीओत (Viral Video) धावत्या लोकल ट्रेनमध्येच एक प्रेमीयुगुल रोमान्स करताना दिसून येत आहे. प्रेमीयुगुलाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून या प्रेमीयुगुलावर कठोरात-कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. झाल्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत

मुंबईच्या लोकलमध्ये जोडप्याचा रोमान्स

व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक लोकल रेल्वेच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक जोडपे रोमान्समध्ये गुंतले आहे. तर त्यांच्या समोरील सीटवर देखील एक तरुणी एका तरुणाच्या मांडीवर बसून मोबाईल फोन वापरत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रेमीयुगुलांनी केलेले हे अश्लील चाळे पाहून नेटकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  (Latest Marathi News)

व्हायरल झालेला हा व्हिडीओ Viral Baba नामक ट्विटर अकाउंटरून शेअर करण्यात आला आहे. ४८ सेकंदाच्या या व्हायरल व्हिडीओत लोकल ट्रेनच्या डब्यातून प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहे. त्याचवेळी सीटवर बसलेले एक जोडपे सर्वांसमोर रोमान्स करताना दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये तरुण तरुणीला मिठी मारून तिचे सतत चुंबन घेत असल्याचे दिसून येते.

तसेच या प्रेमी युगुलाच्या (Mumbai Local Train) समोरील सीटवर देखील एक जोडपे असल्याचे दिसत आहे. एक तरुणी एका तरुणाच्या मांडीवर बसून मोबाईल वापरताना दिसत आहे. या तरुणाचे हात तरुणीच्या नको त्या ठिकाणी दिसत आहेत. विशेष म्हणजे आपण सार्वजनिक ठिकाणी बसलो आहोत, याचेही भान या प्रेमीयुगुलांना राहिलेलं दिसत नाही. दरम्यान, हा व्हिडीओ सांताक्रुज ते लोअर परळदरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमधील असल्याचं बोललं जातंय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com