Jalna Crime : शेतजमिनीचा वाद विकोपाला, मोठ्या भावाने चक्क लहान भावालाच संपवलं; संतापजनक घटना!

Jalna Crime News : शेतजमिनीच्या वादातून एका १८ वर्षीय सावत्र भावाने आपल्या ८ वर्षीय भावाची गळा आवळून हत्या केली.
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam TV

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली. शेतजमिनीच्या वादातून एका १८ वर्षीय सावत्र भावाने आपल्या ८ वर्षीय भावाची गळा आवळून हत्या केली. नराधम भावाने आधी लहान भावाचा रुमालाने गळा आवळला. त्यानंतर त्याच्या तोंडात चिखत कोंबून त्याची निर्दयीपणे हत्या केली. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या भार्डी गावात ही संतापजनक घटना घडली. या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Jalna Crime News
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात १ हजार कोटींचा घोटाळा? काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप

विराज तुकाराम कुढेकर (वय ८ वर्ष) असं झालेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) ऋषिकेश तुकाराम कुढेकर (वय १८) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील भार्डी गावात तुकाराम कुढेकर हे राहतात. तुकाराम यांचे पहिले लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा देखील झाला.

मात्र, पतीसोबत पटत नसल्याने तुकाराम यांची पहिली पत्नी घर सोडून माहेरी गेली. अनेक वर्ष होऊन सुद्धा ती परत न आल्याने तुकाराम यांनी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून तुकाराम यांना विराज (वय ८ वर्ष) वर्षाचा मुलगा झाला. काही दिवसानंतर तुकाराम यांच्या पहिल्या पत्नीने पोटगी मिळण्यासाठी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली. तेव्हापासून दोघांमध्ये जमिनीचे वाद सुरू होते.

दरम्यान, तुकाराम यांचा मोठा मुलगा ऋषिकेश हा अधूनमधून गावाकडे येऊन जमिन वाटपावरून वाद घालत होता. गुरूवारी सुद्धा तो गावाकडे (Jalna News) आला. दुपारी ऋषिकेशने आपल्या ८ वर्षीय सावत्र भावाला गोडबोलून गावातील डाव्या कालव्याच्या शेजारी असलेल्या शेतात नेले. तिथे त्याची गळा आवळून हत्या केली. संतापजनक बाब म्हणजे लवकर जीव जावा म्हणून त्याने विराजच्या तोंडात चिखल देखील कोंबला.

Jalna Crime News
Ahmednagar Accident : देवदर्शनाहून घरी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, ११ जखमी

विराजच्या मृत्युची खात्री पटल्यानंतर ऋषिकेश हा गावात आला. आपण आपल्या सावत्र भावाला मारून टाकल्याचे सांगत त्याने सायकलवरून पळ काढला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पाठलाग करत ऋषिकेशला पकडलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ऋषिकेशला ताब्यात घेतले.

दरम्यान, मृत विराज याच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून सावत्र मुलगा ऋषिकेश आणि त्याच्या आईविरोधात हत्येचा (Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीच्या वादातून सावत्र भावाने आपल्याच भावाची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com