Police officer ends life  Saam tv
महाराष्ट्र

Police officer ends life : दीड वर्षापूर्वी बदली, अचानक पोलीस उपनिरीक्षकाने संपवलं जीवन; कारण काय?

Police officer ends life in virar : दीड वर्षापूर्वी बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांनी अचानक जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षकांनी राहत्या घरी जीवन संवपलं. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही

विरार : विरारच्या अर्नाळामधून खळबळजनक घटना समोर आली आहे. अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विरारच्या बोळीज येथील राहत्या घरी त्यांनी जीवन संवपलं. ते मागील दीड वर्षांपासून अर्नाळा पोलीस ठाण्यातील कार्यरत होते. रतिकांत भद्रशेट्टे असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्नाळा पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलिस उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्टे यांनी आत्महत्या केली आहे. आज मंगळवारी सकाळी रतिकांत यांनी राहत्या घरी जीवन संवपलं. विरारमध्ये पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्टे यांनी आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वी त्यांची अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती.

नेमकं काय घडलं?

अर्नाळा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले ३५ वर्षीय रतिकांत भद्रशेट्टे यांनी राहत्या घरी छताच्या हुकाला बेडशीटच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी या पोलीस उपनिरीक्षकाची पत्नी घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक रतिकांत भद्रशेट्टे मागील दीड वर्षापासून अर्नाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती मिळाली.. हिक दिवसांपूर्वी रतिकांत यांचे सख्खे भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. मात्र ही आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT