Leopard Hunts Dog Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video: पोलीस ठाण्यात बिबट्याची एन्ट्री; कुत्र्याला फाडलं, थरारक व्हिडिओ व्हायरल

Leopard Hunts Dog: बिबट्याने चक्क पोलीस ठाण्यातच कुत्र्याची शिकार केलीय. ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Leopard Hunts Dog At Police Station

महाराष्ट्रातील रत्नागिरीतून एक बिबट्या पोलीस ठाण्यात घुसून कुत्र्याला पळवून नेत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (video viral) झाली आहे.  (latest crime news)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिबट्या पोलीस ठाण्यात घुसतो आणि कुत्र्याची शिकार करून त्याला पळवून नेतो, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीस ठाण्याच्या आत कुत्रे

ही घटना बुधवारी (24 जानेवारी) रात्री रत्नागिरीतील राजापूर पोलीस ठाण्यात घडली. पोलीस ठाण्याच्या आत कुत्रे भटकत होते. कुत्र्यांचा पाठलाग करताना बिबट्या आवारात घुसल्याचं व्हिडिओत दिसतंय.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सुदैवाने बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्याचं लक्षात आल्याने पोलीस ठाण्यातील (ratnagiri police station) सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेकडे धाव घेतली. बिबट्याने कुत्र्याला पोलिस ठाण्याच्या आत पकडले. त्यानंतर अंगणाच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने, जिथे एक विहीर होती. त्या दिशेने बिबट्या निघून गेला. ही संपूर्ण घटना (Leopard Hunts Dog At Police Station) पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलीस ठाण्यात कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

पोलीस ठाण्याच्या आत सुमारे चार ते पाच कुत्रे होते. बिबट्याला पाहून ते सर्व घाबरले. काही पोलीस ठाण्याच्या बाहेर पळाले तर एक कुत्रा खोलीत शिरला. याच खोलीत बिबट्याही घुसला. व्हिडिओत इतर कुत्रे पळून गेल्याचे दिसून येतंय.

व्हिडिओमध्ये एका कुत्र्याच्या मानेला धरून बिबट्या पोलीस स्टेशनमधून बाहेर निघताना दिसत (Leopard Hunts Dog) आहे. बिबट्याने पोलीस ठाण्यातील एकाही कर्मचाऱ्यावर हल्ला केला नाही आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात चांगलीच घबराट पसरली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde Resign : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा, राजभवनावर हालचालींना वेग

Metro Job: मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, पगार १,२०,००० रुपये, पात्रता काय? जाणून घ्या

Nagpur Accident: नागपूरमध्ये भीषण अपघात, ५२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली

Sanjay Raut News : एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री; संजय राऊत यांचा टोला

Maharashtra Politics : रोहितच्या विजयाला दादांची 'पॉवर'? राम शिंदेंचे अजितदादांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT