Pimpri Chinchwad: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं फसवणूक; पोलिसांकडून आरोपीचा गुजरातमध्ये पाठलाग, असा अडकला जाळ्यात

Pimpri Chinchwad Crime News: 'शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला मोठा आर्थिक फायदा मिळवून देतो, असं आमिष दाखवून पिंपरी चिंचवडच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीकडून लाखो रुपये ठगण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam Digital
Published On

Pimpri Chinchwad Crime News:

'शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला मोठा आर्थिक फायदा मिळवून देतो, असं आमिष दाखवून पिंपरी चिंचवडच्या एका प्रतिष्ठित व्यक्तीकडून लाखो रुपये ठगण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीला ठगणाऱ्या ठगाला चिखली पोलिसांनी गुजरातच्या वडनगर या ठिकाणावरून अटक केली आहे. (Latest Marathi News)

दिनेश पथुजी ठाकोर असं अटक करण्यात आलेल्या ठगाचे नाव आहे. ठगणारा आरोपी हा मूळचा गुजरातच्या वडनगर येथील रहिवासी आहे. 'तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, मी तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा मिळवून देतो, असं आमिष दिनेश पथुजी ठाकोर यांनी चिखली येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीला दाखवलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pimpri Chinchwad
West Bengal Crime News : रस्ता चुकलेल्या ३ साधूंना जमावाकडून मारहाण, पोलिसांनी वाचवले प्राण, १२ जणांना अटक

सुरुवातीला त्याने त्या व्यक्तीकडून 50 हजार रुपये गुंतवणूक करून त्या व्यक्तीला जवळपास सव्वा लाख रुपयांचा नफा झाल्याच दर्शवलं होतं. त्यानंतर तुमचं डिमॅट अकाऊंट काढायचं, असं सांगून वेळोवेळी दिनेश पथुजी ठाकोर याने त्या व्यक्तीकडून जवळपास 15 लाख 47 हजार 259 रुपयाची फसवणूक केली होती.

फसवणूक केल्यानंतर दिनेश पथुजी ठाकोर याने आपला मोबाईल फोन बंद करून पसार झाला होता. मात्र चिखली पोलिसांनी योग्य प्रकारे तांत्रिक तपास करून दिनेश पथुजी ठाकोर याला त्याच्या मुळ गाव वडनगर या ठिकाण वरून अटक केली आहे.

Pimpri Chinchwad
Panjab Crime News: क्रुरतेचा कळस! कार थांबवण्याचा इशारा केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास नेले फरफटत; घटना CCTV मध्ये कैद

वाहन चोरी करणारी टोळी गजाआड

परराज्यात विमान प्रवासाने जाऊन त्या ठिकाणी वाहनचोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने आवळल्या आहेत. तसेच या टोळीच्या ताब्यातून दरोडा विरोधी पोलीस पथकाने जवळपास 1 कोटी ५७ लाख रुपये किंमतीच्या 11 चार चाकी वाहन जप्त केले आहेत.

कार चोरणाऱ्या टोळीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील समावेश आहे. भरत खोडकर असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भरत खोडकर हा सांगली पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. तर अजीम सलीम पठाण हा या कार चोरी करणाऱ्या टोळीचा मोरक्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com