West Bengal Crime News : रस्ता चुकलेल्या ३ साधूंना जमावाकडून मारहाण, पोलिसांनी वाचवले प्राण, १२ जणांना अटक

Sadhus Assaulted In Bengal : पश्चिम बंगालमध्ये उत्तर प्रदेशातील तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

Sadhus Assaulted In Bengal 12 Arrested

उत्तर प्रदेशातील तीन साधू मकर संक्रांतीनिमित्त स्नान करण्यासाठी पश्चिम बंगालमधील गंगासागर (Gangasagar Mela) येथे जात होते. ते जाताना रस्ता चुकले. त्यामुळे रस्ता विचारण्यासाठी पुरुलियामध्ये थांबले. दरम्यान जमावाने या साधूंवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी साधूंचे प्राण वाचवले आहे. (latest crime news)

साधूंवर प्राणघातक हल्ला

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) तीन साधूंवर प्राणघातक हल्ला झालाय. स्थानिक लोकांनी या साधूंना अपहरणकर्ते समजलं. त्याच संशयातून जमावाने साधूंवर हल्ला केल्याची माहिती मिळतेय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. साधूंना गर्दीतून वाचवलं आणि जवळच्या पोलीस ठाण्यात नेलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अशी' घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली. यूपीतील (UP) तीन साधू, एक व्यक्ती आणि त्याची दोन मुले मकर संक्रांतीला स्नान करण्यासाठी गंगासागर येथे जात होते. यावेळी ते रस्ता चुकले. त्यानंतर त्यांनी तीन मुलींना रस्त्याबाबत विचारलं. साधूंना पाहताच मुली घाबरल्या. ओरडत पळत सुटल्या. यानंतर स्थानिक लोकांनी साधूला पकडून मारहाण (Sadhus Assaulted In Bengal) करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण वाढल्याने स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही साधूंना काशीपूर पोलीस ठाण्यात आणलं.

१२ संशयितांना अटक

या घटनेची माहिती देताना पुरुलियाचे पोलीस अधीक्षक अभिजित बॅनर्जी म्हणाले की, साधूंवर हल्ला करणाऱ्या १२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. याशिवाय या घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध घेण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुरुलिया जिल्ह्यातील रघुनाथपूर उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात येणार (West Bengal) आहे.

Crime News
Pimpri-Chinchwad Cime News: सोशल मीडियावर PM नरेंद्र मोदी-अमित शहा यांची बदनामी; पिंपरी चिंचवडमधील तरुणाला अटक

साधूंच्या वाहनाची तोडफोड

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. साधूंच्या भीतीने मुली पळून गेल्याने स्थानिक लोकांना संशय आला. त्यानंतर जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी साधूंना गंगासागर येथे नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था केलीय. त्याच वेळी, या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संतप्त जमाव साधूंच्या वाहनाची तोडफोड करताना दिसत (Sadhus Assaulted In Bengal) आहे. भाजपने ममता सरकारवर टीका केली. पुरुलियाचे भाजप खासदार ज्योतिर्मय सिंह महतो यांच्या मते, या हल्ल्यामागे राजकीय हेतू असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, राज्यात सत्तेवर असलेल्या टीएमसीच्या पुरुलिया जिल्हाध्यक्षांनी ही घटना अफवांमुळे घडल्याचा दावा केलाय.

दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत या घटनेवर टीका केली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर लिहिले की, पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये पालघरसारखी लिंचिंगची घटना घडली आहे. मकरसंक्रांतीसाठी गंगासागर येथे जाणाऱ्या साधूंना (Sadhus) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसशी संबंधित लोकांनी विवस्त्र करून मारहाण केली. ममता बॅनर्जींच्या राजवटीत सहाजहान शेख यांना सरकारी संरक्षण मिळत आहे आणि साधूंना मारहाण केली जातेय. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणं हा गुन्हा झालाय, असंही त्यांनी म्हटलंय.

Crime News
Rajasthan Crime News : प्रेमाचा भयंकर शेवट; रात्री घरी भेटायला गेलेल्या प्रियकरानं प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com