राजस्थानमधून एक खळबळजनक अशी घटना समोर आली आहे. प्रेयसीसोबत झालेल्या वादातून प्रियकराने तरुणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलिसांना घटनेची माहीती मिळताच अवघ्या ६ तासांत या घटनेचा छडा लावला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील आसिंद गावात बुधवारी (ता.१०) रोजी ही धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांना घटनेची माहीती मिळताच तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने अवघ्या ६ तासांत या घटनेचा छडा लावला. या घटनेत पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासोबत आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या केलेल्या चौकशीत हत्या केलेल्याचे कारण समजून पोलिसांनी धक्का बसला.
सकाळी उठल्यानंतर घटना आली समोर
मयत तरुणी बुधवारी (ता.१०) रोजी घराबाहेरील एका खोलीत झोपली होती आणि तिची आई ,वडील तसेच दोन लहान भाऊ घरात झोपले होते. सकाळी जेव्हा तिची आई तिच्या बाहेरील खोलीत आली असता तरुणीचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला.त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मयत तरुणी ही बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती.मयत तरुणी (वय १८) आणि तिचा प्रियकर कैलास (वय २०) यांची साधारण सात- आठ महिन्यांपासून मैत्री होती. दोघांनाही लग्न करायचे असल्याचे समजते.आरोपी आणि तरुणी यांच्यात काही दिवसांपासून काही कारणावरुन सतत वाद सुरू होता.
हत्येच्या रात्री दोघांचे फोनवर बोलणे झाले असता तरुणीचा प्रियकर हा त्याच्या मित्रांना तिला भेटण्यासाठी घेऊन आला होता. परंतू कैलासने त्याच्या दोन्ही मित्रांना गावाबाहेर सोडले आणि त्यानंतर तो तिच्या घरी गेला. काही वेळीनंतर त्यांच्यात वाद झाला. वादा इतका वाढला की तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
६ तासांत घटनेचा लावला छडा
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा सुरु केली तसेच पोलिसांनी सायबर सेलची ही मदत घेतली. श्वान पथक आणि एफएसएल पथकांनी घटनास्थळ आणि परिसराचा तपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने परीसरातील अनेक फुटेज तपासले गेले. यात पोलिसांनी तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या काही मित्रांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.