सांगलीतील येडेनिपाणी परिसरात बिबट्याचा वावर वाढला
बिबट्या नारळाच्या झाडावर चढून खाली उतरताना दिसला; व्हिडिओ व्हायरल
पिलांसह वारंवार दर्शनामुळे शेतकरी-ग्रामस्थांत भीती
डोंगर, झाडी, ऊसशेतीमुळे बिबट्याला पोषक अधिवास
विजय पाटील, सांगली
राज्यात बिबट्याचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक गावात दिवस रात्र बिबट्याची दहशत पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी अलिबागमध्ये भरदिवसा बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला होता. त्यांनतर मुंबईतील मीरा भाईंदर परिसरात बिबट्याने नागरिकांना सळो की पळो करून सोडलं. मात्र आता हाच बिबट्या एका नारळाच्या उंच झाडावरून खाली येताना गावकऱ्यांना दिसला.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील परिसरात एका नारळाच्या झाडावर बिबट्या चढलेला दिसला आणि नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरताना काही ग्रामस्थांना आढळला. यावेळी ग्रामस्थांनी याचा व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. मात्र या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
तर गेल्या महिनाभरात अनेक वेळा या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. जोतिबा खिंड परिसरात उत्तम पाटील यांच्या शेतात नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरताना काही लोकांना दिसला. काहींनी चित्रिकरणही केले. या परिसरात डोंगर व गर्द झाडी असल्याने तसेच ऊसशेती असल्याने बिबट्याचा वावर आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी याच परिसरात रात्रीच्या वेळी काही शेतकऱ्यांना तरसही दिसून आले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास शेतकरी घाबरू लागले आहेत. येडेनिपाणी परिसरात बिबट्या व त्याच्या पिलांचे सातत्याने दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या हा एक अत्यंत बलाढ्य आणि चपळ प्राणी असून तो आपल्या शिकारीला किंवा स्वतःला वाचवण्यासाठी ५० फूट किंवा त्याहून अधिक उंचीच्या झाडांवर सहज चढू शकतो, जिथे तो आपली शिकार सिंह किंवा तरस यांसारख्या इतर प्राण्यांपासून सुरक्षित ठेवू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.