Badlapur : बसचा सिनेस्टाईल पाठलाग केला, पुलावर गाठलं, कुऱ्हाड घेऊन बस चालकावर हल्ला; बदलापूरमधील धक्कादायक घटना|VIDEO

Badlapur Bus Driver Attacked Crime News : बदलापूरमध्ये बस चालकावर हल्ला. कारच्या बाजूने बस काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे कार चालक संतापला. संतापलेल्या कारचालकाने मित्रांसह बसचालकाला मारहाण केली.
Badlapur : बसचा सिनेस्टाईल पाठलाग केला, पुलावर गाठलं, कुऱ्हाड घेऊन बस चालकावर हल्ला; बदलापूरमधील धक्कादायक घटना|VIDEO
Badlapur Bus Driver Attacked Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • भर रस्त्यात बस थांबवून चालकावर हल्ला

  • कारचालकाने मित्रांसह बसचा पाठलाग करून उल्हास नदी पुलावर बस रोखली

  • प्रवाशांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.

  • व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू

मयुरेश कडवं, बदलापूर

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करून काही गुंडांनी प्रवाशांना लुबाडलं. याशिवाय चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यानंतर आता बदलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वाहन चालकाने भर रस्त्यात बस थांबवून बस चालकावर हल्ला केला आहे. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ ठरलाय. या मारहाणीचा व्हिडिओ एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केला आहे.

बदलापूरहून मुरबाडला जाणारी बस ही बदलापूर बाजारपेठेतून जात असताना एक कार रस्त्यात मध्ये उभी होती. बस चालकाने कारच्या बाजूने बस काढण्याचा प्रयत्न केला असता त्या कारचालकाला राग आला आणि त्याची आणि बस चालकासोबत बाचाबाची झाली.

त्यानंतर बस बदलापूर गावातील उल्हास नदीच्या पुलावरून जात असताना कार चालकाने बसचा पाठलाग करून बस भरस्त्यात थांबवली आणि मित्रांसोबत बसमध्ये घुसून चालकावर हल्ला केला. यावेळी त्या कार चालकाने सोबत कुऱ्हाडही आणली होती.

Badlapur : बसचा सिनेस्टाईल पाठलाग केला, पुलावर गाठलं, कुऱ्हाड घेऊन बस चालकावर हल्ला; बदलापूरमधील धक्कादायक घटना|VIDEO
Nagpur : झोपेत आईच्या कुशीतून उचलले, छाती आणि दोन्ही हात खाल्ले; नागपुरात प्राण्याच्या हल्ल्यात ८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

मात्र बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी त्या कार चालकावर बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या सतत घडणाऱ्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com