Viral Video : girl in gram sabha of Latur's Chikalthana village
Viral Video : girl in gram sabha of Latur's Chikalthana village saam tv
महाराष्ट्र

Viral Video : चिमुकलीने ग्रामसभेत विचारला सवाल; सरपंच, ग्रामसेवकाची उडाली तारांबळ! पाहा व्हिडिओ

दीपक क्षीरसागर

Latur News: ग्रामसभा ही गावातील समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ असते. ग्रामसभेत गावातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा केली जाते. या ग्रामसभेत सामान्यात: ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य, ग्रामसेवक आणि गावातील वडीलधारे लोक प्रश्न मांडतात आणि त्यावर निर्णय घेतले जातात. परंतु लातूर जिल्ह्यातील चिकलठाणा येथे ग्रामसभेत चौथीत शिकणाऱ्या एका मुलीने रस्त्याचा प्रश्न उपस्थित करत सरपंच आणि ग्रामसेवकांना चांगलंच धारेवर धरलं. या प्रसंगाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भारत हा लोकशाही असलेला देश आहे. देशाने नुकताच ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. याच दिवशी म्हणजे 26 जानेवारीला लातूरच्या चिकलठाणा गावांत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सरपंच उत्तम बनसोडे आणि ग्रामसेवक अवधूत कलबोणे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.

ग्रामसभा सुरू असताना अचानक गावातील वैभवी बुदृपे ही चौथीत शिकणारी मुलगी ग्रामसभेत आली आणि तिने रस्त्याचा विषय मांडला.वैभवीने रस्ता कधी होणार आहे असा सवाल करत सरपंच आणि ग्रामसेवकांना धारेवर धरले. "तीन महिने झाले वाट पाहत आहे, तुम्ही सरपंच ही झाले मात्र रस्ता होत नाही. त्यावेळी तुम्ही रस्ता करतो म्हणाले होते, मग कधी करणार रस्ता", असे प्रश्न वैभवीने विचारले.

वैभवीने भर ग्रामसभेत "आम्हाला तो रस्ता नीट करून पाहिजे म्हणजे पाहिजेच" अशी मागणी केली आहे. ग्रामसभेत या चिमुकलीने विचारलेल्या प्रश्नांमुळे सरपंच आणि ग्रामसेवक निरुत्तर झाले. अखेर त्यांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून देवू असा शब्द दिला आणि त्यानंतर वैभवी तेथून निघून गेली. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लोक या मुलीचं कौतुक करत आहेत.

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : शिक्षकाच्या मुलाला हरवण्यासाठी पंतप्रधान मैदानात, हाच माझा विजय - निलेश लंके

Jitendra Awhad News | Jitendra Awhad News | एकनाथ शिंदेंना मी ठाणं दाखवलं, म्हस्के नारायण राणेंसोबत पळून जाणार होते - आव्हाड

ICC T20 World Cup 2024: मोठी बातमी! टी -२० वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याचे संकट

Mumbai North East : मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मज्जाव; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार पडणार; अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT