Nashik Lok Sabha: ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी CM शिंदेची मोठी खेळी; नाशिकमध्ये काहीतरी मोठं घडणार!

Thackeray Faction Vs Shinde Faction: नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे विरुद्ध शिंदे गट
Thackeray Faction Vs Shinde FactionSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये गेले कित्येक दिवस महाविकास आघाडी आणि महायुतीत जागेचा तिढा सुरू होता. त्यानंतर आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Nashik Lok Sabha Constituency) रणधुमाळीमध्ये शिवसेना शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत नाशिक शहरासह जिल्ह्यातील ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.

तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील (Uddhav Thackeray) पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, माजी जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्यांसह अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कालच ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरे गटातील आणखी पदाधिकाऱ्यांचे शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा प्रचाराचा धडाका नाशिकमध्ये सुरू आहे. अशातच अनेक नेते पक्षाची साथ सोडत असल्याचं दिसत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे गटातील नेत्यांचं गाळप (Shinde Faction) सुरू असल्याचं दिसत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं समोर आलं आहे. नाशिकमध्ये पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठाकरे विरुद्ध शिंदे गट
Nashik Lok Sabha: शिंदे गटाची ताकद वाढली, ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

ठाकरे गटाने नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विजय करंजकर नाराज असल्याने त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आताही ठाकरे गटाचे आणखी काही पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची (Maharashtra Politics) माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदेंनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मोठी खेळ खेळल्याचं बोललं जात आहे. आता आणखी कोणते पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे विरुद्ध शिंदे गट
Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा खेळ बिघडणार? बंडखोरांनी वाढवलं टेन्शन, महायुतीत पुन्हा धुसफूस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com