ICC T20 World Cup 2024: मोठी बातमी! टी -२० वर्ल्डकपवर दहशतवादी हल्ल्याचे संकट

Terror Attack Threat On ICC T20 World Cup 2024: येत्या १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
ICC T20 World Cup 2024
ICC T20 World Cup 2024X / @mufaddal_vohra

येत्या १ जूनपासून वेस्टइंडीज आणि अमेरिकेत आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्सची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. वेस्टइंडीजला टी -२० वर्ल्डकपदरम्यान दहशतवादी संघटनेकडून हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी उत्तर पाकिस्तानातील अफगाणिस्तान - पाकिस्तान ब्रांच म्हणजेच आयएस - खोरासानकडून देण्यात आली आहे.

टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी जगातील नामवंत संघ वेस्टइंडीजमध्ये दाखल होणार आहेत. हल्ला करण्याची धमकी आली असली तरी देखील वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डने आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने खंबीर असल्याचं म्हटलं आहे. वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डचे सीईओ जॉनी ग्रेव्स यांनी म्हटले की, ' स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना आम्ही खात्री देऊ इच्छितो की, आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येकाची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना देखील आहे.'

ICC T20 World Cup 2024
KL Rahul Statement: लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

मिळालेल्या माहितीनुसार , प्रो इस्लामिक स्टेटकडून टी -२० वर्ल्डकप स्पर्धेवर संभाव्य हल्ल्याची माहिती नशीर पाकिस्तान या मीडिया ग्रुपद्वारे समोर आली आहे. डेली एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, नशिर ए पाकिस्तान हे इस्लामिक स्टेट गटाशी संबंधित असलेले एक प्रचार चॅनल आहे.

ICC T20 World Cup 2024
LSG Playoffs Scenario: KKR विरुद्धच्या पराभवानंतर लखनऊचं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

या शहरांमध्ये होणार सामने..

आगामी आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत संयुक्तरीत्या खेळवली जाणार आहे. वेस्टइंडीजमध्ये होणारे सामने अँटीग्वा आणि बारबुडा, गयाना, सेंट लुसिया, बार्बाडोस, सेंट विसेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद अँड तबॅगोमध्ये होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com