Nashik, trimbakeshwar saam tv
महाराष्ट्र

VIP Darshan in Trimbakeshwar : जिल्हाधिका-यांच्या विनंतीनंतरही त्र्यंबकेश्वर देवस्थान निर्णयावर ठाम, आजपासून व्हीआयपी दर्शन सुविधा बंद

श्रावण मास निमित्त भाविक भाेलेनाथाचे दर्शन घेत असतात.

अभिजीत सोनावणे

Nashik News : शासकीय सुट्टया आणि श्रावण मासात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन आजपासून (शनिवार, ता. 11) १५ सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानचा सामान्य भक्तांना दिलासा देणारा हा निर्णय ठरणार आहे. (Maharashtra News)

श्रावण महिन्यात देश-विदेशातून हजाराे भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात. यंदा श्रावण महिन्यापु्र्वी अधिक मास देखील आला आहे. अधिक मास निमित्त नागरिक माेठ्या भक्ती भावाने धार्मिक कार्यक्रम करीत असतात. विविध मंदिरात जाऊन देव देवतांचे दर्शन घेत असतात.

सध्या श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी हाेत आहे. यामुळे मंदिरात पोहोचेपर्यंत भाविकांना पाच ते सहा तासांचा वेळ लागताे. भाविकांना दर्शनासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी व्हीआयपी दर्शन सुविधा बंद (VIP Darshan in Trimbakeshwar Closed) करण्याचा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान घेतला आहे.

दरम्यान देशभरातून येणाऱ्या व्हीआयपींसाठी व्हीआयपी दर्शन व्यवस्था सुरू ठेवावी याबाबत जिल्हाधिकारी यांनी मंदिर प्रशासनाशी पत्रव्यवहार केला हाेता. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतरही मंदिर प्रशासन व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहे.

परिणामी व्हीआयपी दर्शनावरून त्रंबकेश्वर देवस्थान आणि जिल्हाधिकारी आमने-सामने आलेत. दरम्यान २०० रुपये सशुल्क व्हीआयपी दर्शन १५ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, महिलेला परत आणून दिला दागिना

Post Diwali Care: दिवाळीनंतर खूप थकवा अन् चेहरा डल दिसतोय? मग हे सोपे उपाय ठरतील बेस्ट

laughter chefs 3: सहा महिन्यांतच 'लाफ्टर शेफ्स'च्या नव्या सीझनची सुरुवात; 'हे' फेमस स्टार्स लावणार कॉमेडीचा तडका

Maharashtra Live News Update: ऐन दिवाळीमध्ये गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

Mokhada : ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर; वैद्यकीय अधिकारी नसल्याने बालकाचा मृत्यू?, नातेवाईकांचा आरोप

SCROLL FOR NEXT