Pandharpur News , Shri Vitthal Rukmini saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

भारत नागणे

Pandharpur News : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरातील विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून लाखाे भाविक येत असतात. या भाविकांना दर्शन घेताना काेणत्याही अडचणी येऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास केल्या आहेत. (Maharashtra News)

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पंढरपूरातील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटविली जातील. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसरातील रस्त्यांवर पत्रा शेड उभारणार आहाेत. तसेच दर्शन रांगेतील भाविकांना पाणी आणि नाष्टा देण्याची व्यवस्था केली जाईल.

याबराेबरच चंद्रभागा नदी पात्रातील खड्डे बुजविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असेही विखे-पाटील यांनी नमूद केले. दरम्यान पायी दिंड्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केली आहे. तसेच नोंदणी न करणा-या दिंड्यांना मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा न देण्याचा विचार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाेलून दाखविला.

दरम्यान विठ्ठल मंदिर नुतूनीकरणाचा‌ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ हाेणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते म्हणाले आषाढी दिवशी पंढरपूरात लाखाेंच्या संख्येने भाविक येतात. या भाविकांची काेणत्याही प्रकारची अडचण हाेऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. यंदा पंढरपूरात आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखूमाई मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा (vip darshan seva in pandharpur) बंद राहणार असल्याचे विखे-पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

SCROLL FOR NEXT