Vinod Tawde News Vinod Tawde News
महाराष्ट्र

Maharashtra Politics : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप, बविआ कार्यकर्त्यांनी घेरलं, विरारमध्ये राडा, Exclusive VIDEO

Vinod Tawde News : विरारमध्ये विनोद तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरलेय. तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

Namdeo Kumbhar

Virar Vinod Tawde News : प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतरही राज्यातील राजकारण मात्र तापलेले आहे. विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि विनोद तावडे यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं समोर आलेय. विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना अडवले. तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा अन् बाचाबाची झाल्याची चर्चा आहे.

विरार पूर्वच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे पैशांची बॅग घेऊन गेल्याचा आणि पैसे वाटप केल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. मात्र, भाजपच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

बविआच्या कार्यकर्त्यांना विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे यांना घेरलं. यावेळी विनोद तावडे आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. व्हिडीओमध्ये पाकिटं दिसत आहेत, ती पैशांचीच आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. बविआच्या आरोपाचं विनोद तावडे यांनी खंडन केलेय. आम्ही पैसे वाटले नाहीत, असे तावडेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

प्रवीण दरेकर काय म्हणाले ?

मला वाटतंय पैसे वाटायला विनोद तावडे जातीलच का...ते पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले असू शकतात. पराभव दिसू लागल्याने अशा प्रकारचा आरोप केला जात आहे. चौकशी आणि निष्कर्षाअंती काय खरं आहे हे समोर येईल.

नाना पटोले काय म्हणाले ?

निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. हॉटेलमध्ये पैसे सापडले आहेत. पैसे वाटपाचा आरोप होत आहे. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी.

मतदानाला २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असताना राज्यात पैसे वाटपाच्या घटना समोर येत आहेत. विरारमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप केला. विरारमधील विवांत हॉटेलमध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरत जाब विचारला. त्यावेळी तावडेंनी आरोपाचं खंडन केले. व्हिडीओत बविआच्या कार्यकर्त्यांनी पाकिटाचे रॅपर दाखवत तावडेंना सवाल केल्याचं दिसत आहे.

व्हिडिओत काय दिसतं?

विरारमध्ये विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. विनोद तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे. याचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडिओ समोर आला आहे.

विनोद तावडे हे खुर्चीवर मध्यभागी बसले आहेत. तर विनोद तावडे यांना वबिआच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे. काही कार्यकर्ते पैशांची पाकीटं आणि पैसे हातात घेऊन ते कॅमेऱ्यासमोर दाखवत असल्याचे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Limbu- Mirchi Impotance: लिंबू- मिरची दारावर का टांगतात?

Shocking: मांडीवरून हात फरवला, नंतर टीशर्टमध्ये हात घातला; धावत्या बसमध्ये तरुणीसोबत भयंकर घडलं, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT