Vinod tawade news Vinod tawade news
महाराष्ट्र

Vinod Tawde Money Distribution : १५ कोटी वाटल्याचा तावडेंवर आरोप, विरोधक म्हणतात मान्य करा; भाजप म्हणाले, पैसे वाटायला जातीलच का

Vinod Tawde Money Distribution : विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप झाला अन् राज्यात खळबळ उडाली. तावडेंना बविआच्या कार्यकर्त्यांना ३ तासांपासून घेराव

Namdeo Kumbhar

Vinod Tawde Money Distribution : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विनोद तावडे यांनी १५ कोटी वाटल्याचा आरोप बविआकडून कऱण्यात आला. याप्रकरणी मागील तीन तासांपासून बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातलाय. विरारमधील विवांत हॉटेलमध्ये जोरदार राडा सुरु आहे. भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा अन् हाणामारी झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. विनोद तावडे यांच्यावर १५ कोटी वाटल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली. आयोगाने कारवाई करावी, असे म्हणत विरोधकांनी आयोगाचं लक्ष वेधलं. तर सत्ताधाऱ्यांनी बदनाम करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली. विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पैसे वाटल्याचा आरोप फेटाळले आहेत. कोण काय म्हणाले पाहूयात...

हितेंद्र ठाकूर यांचे आरोप काय ?

विनोद तावडे आणि राजन नाईक बॅगेत १५ कोटी घेऊन आले. तावडेंच्या डायरीत १५ कोटींची नोंद आहे. कारवाई होत नाही तोपर्यंत तावडे माझ्यासमोरच राहतील, असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा काय आरोप -

सत्तेचा वापर करून निवडणुका जिंकण्यासाठी गैरप्रकार करणार असतील तर उद्रेक होणारच आहे. आतापर्यंत दहा दिवसांत आम्ही काहीही केलं नाही. कुठंही उल्लंघन होईल असं कृत्य केलं नाही. ४८ तास आधी बाहेरच्या लोकांनी मतदारसंघात येऊ नये, ही निवडणूक आयोगाची भूमिका असताना कळवा मुंब्रात बाहेरचे लोकच जास्त आहेत. कोण भांडूप, विक्रोळी, कन्नमवार नगर, गँगस्टर लोकांचे भाऊ-बंधू आहेत. बाहेरच्या लोकांचं कळवा, मुंब्रात काय काम आहे? बाहेरच्या लोकांना ४८ तास आधी मतदारसंघात बंदी आहे, हा कायदा आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अतुल भातखळकर यांचा बविआवरच आरोप -

बहुजन विकास आघाडीची ही गुंडागर्दी आहे. पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळे हे खोटेनाटे आरोप आहेत. जर का यांची तक्रार खरी असती तर पोलिसांत गेले असते. कायदा कसा काय हातात घेऊ शकतात. वातावरण खराब करायचं, लोक मतदानाला बाहेर पडणार नाही यासाठी वातावरण निर्माण करायचं. हा बदनाम करण्याकरता, वातावरण बिघडवण्यासाठी हा उद्योग आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

नाना पटोलेंची लक्षवेधी प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. हॉटेलमध्ये पैसे सापडले आहेत. पैसे वाटपाचा आरोप होत आहे. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. आरोपांचे खंडन करण्याचे कारण काय...ज्या हॉटेलमध्ये थांबलेत तावडे. त्याच हॉटेलमध्ये पैसे मिळाले आहेत. त्याच्याकडे पैसे मिळाले आहेत. मान्य करा की भ्रष्टाचारी आहेत ,असेही नाना पटोले म्हणाले.

प्रवीण दरेकर काय म्हणाले ?

मला वाटतंय पैसे वाटायला विनोद तावडे जातीलच का...ते पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गेलेले असू शकतात. पराभव दिसू लागल्याने अशा प्रकारचा आरोप केला जात आहे. चौकशी आणि निष्कर्षाअंती काय खरं आहे हे समोर येईल, प्रवीण दरेकर म्हणाले.

संजय राऊत यांचा हल्लाबोल -

भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरांनी केले, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hitendra Thakur : पत्रकार परिषद घेऊ नका, असं कोणत्या कायद्यात आहे? हितेंद्र ठाकूर यांचा सवाल, VIDEO

Parola News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon Election: पाचोऱ्यात मविआच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक, आमदारावर आरोप

Vinod Tawde : '४० वर्षे निवडणुकीत...'; पैसे वाटप केल्याच्या आरोपावर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...VIDEO

Maharashtra News Live Updates: अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

SCROLL FOR NEXT