maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : चौकशी झाल्यास ६० लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरतील; ठाकरे गटाचा मोठा दावा

vinayak raut on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं.

अमोल कलये

मुंबई : लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचे पडसाद विरोधी पक्षातही उमटू लागले आहेत. लाडकी बहीण योजनेची नव्याने चौकशी झाल्यास साठ लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.

लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेवर विनायक राऊत म्हणाले, 'केवळ विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी महिलांना पैसे दिले नाही. या योजनेची नव्याने चौकशी झाल्यानंतर साठ लाखांहून अधिक महिला या योजनेतून बाद होतील'.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, 'शिर्डीमधील त्यांच्या कार्यक्रमात येऊन त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलावं लागतं, याचाच अर्थ राज्यात उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रात वर्चस्व आहे हे मान्य करावं लागेल. राज्यातील इतर घटनांवर न बोलता फक्त टीका करतात. निधीच्या बाबतीत महाराष्ट्राला डावललं जात आहे. यावर न बोलता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करणार असतील, तर त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावं'.

यावेळी आगामी महापालिका निवडणुकीवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही. ती कार्यकर्त्यांची भावना होती. स्वबळावर लढण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे राऊत पुढे म्हणाले.

बीड प्रकरणावर विनायक राऊत काय म्हणाले?

'सुरेश धस यांनी बीडमधील प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या कामाची माहिती घ्यावी. सत्याची बाजू घेतली म्हणून पंकजा मुंडे यांचा पापड होत असेल, तर त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही विनायक राऊत पुढे म्हणाले. 'धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नैतिकता अजित पवारांकडे नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT