pandharpur , students SaamTv
महाराष्ट्र

Positive News : युवकांनी जीव धोक्यात घालून वाचवला विद्यार्थ्यांचा जीव

यावेळी लहान मुलं घाबरुन गाेंधळ करीत हाेती.

भारत नागणे

Pandharpur News : गेले दाेन तीन दिवसांपासून साेलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसानं (rain) दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बहुतांश भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. माेडनिंब येथे पूराच्या पाण्यात वाहून जाणा-या विद्यार्थ्यांना (student) वाचविण्यात युवकांना यश आलं आहे. (Pandharpur Latest Marathi News)

माढा तालुक्यातील मोडनिंब व परिसरात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पावसामुळे येथील वेताळ ओढ्याला पूर आला आहे. त्यामुळे मोडनिंब गावा जवळील पूल पाण्याखाली गेला आहे. या परिसरात पूराच्या पाण्यात मोटारसायकल वरील दोन शाळकरी मुलांसह तीन जण वाहून जात हाेते. हा प्रसंग स्थानिक युवकांनी पाहिला. या युवकांनी त्यांना धीर देत मदतीसाठी धाव घेतली. (Maharashtra News)

यावेळी लहान मुलं घाबरुन गाेंधळ करीत हाेती. पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची दुचाकी वाहून गेली. स्थानिक युवकांनी दोन लहान मुलांसह तिघांना पाेहत पाेहत जात पाण्याबाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे पंधरा मिनीटांनंतर युवकांना तिघांना वाचविण्यात यश आलं. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोईसर तारापूर एमआयडीसीतील महागाव जवळ असलेल्या रिस्पॉन्सिव्ह कंपनीत आग

कुकर अन् चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट; तूप तयार करण्याची पाहा सर्वात सोपी पद्धत, मिनिटांत तूप तयार

Politics : हायव्होल्टेज ड्रामा! भडकलेल्या भाजप खासदाराने चालकाच्या कानाखाली मारली, नेमकं काय घडलं? VIDEO

Mouni Roy: नागिन फेम मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक पाहिलात का?

दुहेरी हत्याकांडाचा थरार; रस्त्याच्या कडेला आढळला वडील अन् मुलाचा मृतदेह, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT