Kolhapur : संजय घोडावत समूहाच्या स्टार एअरनं कोल्हापूर - मुंबई विमान सेवा (kolhapur mumbai) नुकतीच सुरू केली आहे. ही सेवा (airline) उड्डाण प्रादेशिक सेवा योजनेंतर्गत असेल. मायभुमी कोल्हापूरहून (kolhapur) ही सेवा देताना आम्हाला विशेष आनंद हाेत आहे अशी भावना समूहाचे संस्थापक संजय घोडावत (Sanjay Ghodawat) यांनी नमूद केले आहे. (LIVE Marathi News)
आतापर्यंत स्टार एअरने विविध क्षेत्रांतील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देत स्वतःचे एक वेगळे स्थान बाजारपेठेत निर्माण केले आहे. स्थानिक पातळीवर हवाई सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा स्टार एअरचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आता स्टार ग्रुपने नागरिकांसाठी कोल्हापूर ते मुंबई विमान सेवा सुरू केली आहे.
या माध्यमातून ग्राहकांना आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्याचा ग्रुपचा प्रयत्न आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर - मुंबई दरम्यान आठ ते दहा तासांची बचत होणार आहे असे घाेडावत यांनी नमूद केले. (Kolhapur Latest Marathi News)
स्टार एअरच्या फ्लाइटचे काेल्हापूर हे 19 वे डेस्टिनेशन आहे. यामुळे पर्यटक कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांकडे आकर्षित होतील. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील आणखी वाढेल असे घाेडावत ग्रुपनं नमूद केले.
मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस कोल्हापूर-मुंबई विमानसेवा असेल. सुमारे चाळीस मिनीटात प्रवाशांचा प्रवास पुर्ण हाेईल असे श्रेणिक घाेडावत यांनी नमूद केले. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर उड्डाणे वाढवण्यात येणार आहेत. सरकारच्या उडान योजनेंतर्गत स्टार एअर प्रवाशांना सुविधा देणार असल्याचे श्रेणिक यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.