बीडच्या शिंदेवस्तीकरांना रस्ता नसल्याने करावा लागतोय जीवघेणा जलप्रवास! विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या शिंदेवस्तीकरांना रस्ता नसल्याने करावा लागतोय जीवघेणा जलप्रवास!

बीडच्या पाटोदा तालुक्यातील शिंदेवस्ती येथे नागरिकांचा स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही, या रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे. लोकप्रतिनिधींनी हा विषय कधीच गांभीर्याने घेतला नसल्याची ओरड ग्रामस्थ करत आहेत.

विनोद जिरे

बीड - आतापर्यंत आपण रस्ता नसल्याने, खड्डेयुक्त, पांदण, डोंगराळ भागातून, नागरिक करत असलेला प्रवास पाहिला असेल! मात्र गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, नागरिकांना चक्क जीवघेणा जलप्रवास करावा लागतोय. हा जल प्रवास नक्षलग्रस्त, आदिवासी, कोकणपट्ट्यातील नसून, हा मराठवाड्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या, बीडच्या शिंदेवस्तीवरील आहे. स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही, या शिंदेवस्ती करांचा रस्त्यासाठीचा संघर्ष कायम सुरूच आहे.

बीडच्या पाटोदा तालुक्यातील शिंदेवस्ती या ठिकाणी 40 ते 50 घरे असून 230 लोकसंख्या व 130 मतदार वास्तव्यास आहेत. या वस्तीवरील ग्रामस्थ अत्यंत वेदनादायक जीवघेण्या वास्तवाला सामोरे जात आहेत. गेल्या 21 वर्षांपासून वस्तीवर जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने, वर्षातून आठ महिने या गावकऱ्यांना, धोकादायक जीवघेणा जलप्रवास करावा लागतोय. हि जल प्रवासाची अत्यंत धोकादायक वेळ, शिंदेवस्ती येथील लहानमुलांसह वृद्ध आणि महिलांवर आहे. हा प्रवास करताना अनेक वेळा यात बुडून मरण्याचा धोका झाल्याचे देखील ग्रामस्थ सांगतात.

हे देखील पहा -

गावात शाळा व हॉस्पिटल या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना याचं चप्पूवर बसून, बाहेर जावे लागते. विशेष म्हणजे येथील तरुणांना लग्नासाठी वधु मिळणे देखील मुश्किल झाले असून, रस्ता नसल्याने विवाह जमत नसल्याची खंत येथील तरुण व्यक्त करतात. महत्वाचे म्हणजे या गावच्या मतदार संघात दोन विद्यमान आमदार आहेत. आमदार सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

यवतील महिला अश्विनी शिंदे यांनी सांगितले, की याचं चप्पूवरून आम्हाला रोज येणं जाणं करावं लागतंय. आमच्या लेकरांना इंग्लिश मिडीयमला शिकवू शकत नाहीत. इथंच प्राथमिक शाळा आहे तिथं पाठवलं. लोकप्रतिनिधी निवडणूक आली कि येतात आणि ताई आम्हाला मतदान करा, आम्ही रस्ता देऊ म्हणतात. मात्र पुन्हा येत नाहीत. केवळ आम्हाला रस्ता द्यावा हीच आमची मागणी आहे.

तर रस्ता नसल्यामुले येथील शाळकरी मुलगी जानवी म्हणाली, की माझी खूप इच्छा आहे इंग्लिश स्कुलला जायची. मात्र माझे पप्पा हॉटेलवर कामाला जातात. त्यामुळं मला सोडवायला कुणीच नसतं. त्यामुळं आम्ही घरीच राहतो. अशी खंत चिमुकल्या जानवीने व्यक्त केली.

तर येथीलच शिवाजी शिंदे हे जनावरे सांभाळत असतांना दुसऱ्या बाजूने येणारे, त्यांचे भाऊ अचानक पाण्यात पडले. मात्र ते वृध्द असल्याने त्यांना काहीचं करता आलं नाही. आरडाओरडा केल्यामुळं शेजारच्या शेतातील मुलं पळत आले आणि त्यांना काढलं. असा प्रसंग त्यांनी सांगितला. तुमच्या शिंदेवाडीला रस्ता करू म्हणून गेल्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब अजबे म्हणाले होते. मला सहकार्य करा, मी निवडून आलो की तुमचे सर्व प्रश्न सोडवेन मात्र ते निवडून आल्यानंतर एकदाही आले नाही. त्याचबरोबर आमदार सुरेश धस देखील 15 वर्ष आमदार होते. त्यांनी देखील काहीच केलं नाही. आमची एकच मागणी आहे की आम्हाला चालण्यापुरता रस्ता करून द्यावा. अन्यथा येणाऱ्या 15 तारखेला स्वातंत्र्यदिनी आमचा त्रास आंदोलनातून दाखवू. अशा इशारा या गावातील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

बीडच्या या शिंदेवस्तीवर अनेक वेळा आमदार आले ते फक्त निवडणुकीलाचं अन निवडणूक संपली की पुन्हा मात्र आलेच नाहीत ! लहान मुलांना, वृद्धांना व गावातील गरोदर महिलांना या याचं चप्पूवर बसून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रात्री-अपरात्री या पाण्यातून ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनास आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार आहे का ? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT