ग्रामपंचायत नसल्याने पांघरी महादेव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार गजानन भोयर
महाराष्ट्र

ग्रामपंचायत नसल्याने पांघरी महादेव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाला मागील २० वर्षांपासून ग्रामपंचायतच नाही

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाला मागील २० वर्षांपासून ग्रामपंचायतच नाही. ग्रामपंचायत मिळावी यासाठी वारंवार विविध स्तरावर मागणी करून देखील त्याची दखल घेण्यात न आल्याचे निषेधार्थ होऊ घातलेल्या 5 ऑक्टोबर दिवशी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी हाती घेतला आहे.

या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. मागील 22 वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्याच विभाजन होऊन, वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली. तेव्हा पांघरी हे गाव अकोला जिल्ह्यात होते. मात्र, जिल्हा निर्मिती नंतर वाशिमला जोडण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून पांघरीला ग्रामपंचायतच नाही किंवा कोणत्या ग्रामपंचायतला जोडले नाही.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे मंगरुळपीर तालुक्यात अतिशय दुर्गम भागांत पांगरी महादेव हे गाव मागील अनेक वर्षांपेक्षा वसलेले आहे. या गावांतील सर्व रहिवासी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतात. त्यांच्याकडे शेतीही आहे. स्वत:ची घरे आहेत. मात्र गावाची ओळख असलेली ग्रामपंचायत नाही, तर इतर कोणत्याही ग्रामपंचायती सोबत हे गाव जोडण्यात सुद्धा आले नाही.

यामुळे शिक्षण, आरोग्य, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून कायम वंचित राहण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. आपल्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी किंवा जवळच्या ग्रामपंचायत सोबत गावाला जोडण्यात यावे या करीता ग्रामस्थांकडून शासनस्तरावर अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, शासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची दखल न घेण्यात आल्याचे निषेधार्थ 5 ऑक्टोबर दिवशी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT